SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

डोंबिवलीत रेल्वे रुळवार सापडला होता मृतदेह; 28 वर्षांनतर बिहारमधून आरोपीला अटक; तपासात धक्कादायक माहिती उघड

डोंबिवली रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली. डोंबिवलीत रेल्वे रुळवार मृतदेह सापडला होता. या प्रकरणी 28 वर्षानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 20, 2026, 10:30 PM IST | Updated: Oct 20, 2026, 10:33 PM IST
Join

डोंबिवली क्राईम : डोंबिवली रेल्वे पोलिसांनी हत्या प्रकरणात फरार असलेल्या एका आरोपीला तब्बल 28 वर्षानंतर बिहार येथून बेड्या ठोकल्या आहेत. संदीप कृष्णन असे अटक आरोपीचे नाव आहे. प्रमोद यादव, विनेश कृष्णन हे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. 28 वर्षांपूर्वी रेल्वे रुळावर एक मृतदेह सापडला होता. पोलिसांनी कोणाताही पुराव नसताना या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.  

1998 म्हणजेच तब्बल 28 वर्षांपूर्वी कोपर डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान शैलेश मोरे नावाच्या इसमाचा मृतदेह छिन्न विच्छिन अवस्थेत आढळला होता. रेल्वे पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. प्रथमदर्शनी रेल्वे अपघात असल्याचे वाटत असले तरी पोलिसांना संशयाला त्यांनी या प्रकरणी तपास सुरू केला. तपासा दरम्यान या इसमाची हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकण्यात आला होता असे निष्पन्न झाले. 

पोलिसांनी शैलेश मोरे यांचा ठावठिकाणा तसेच त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला. याच दरम्यान पोलिसांनी संदीप कृष्णन , प्रमोद यादव विनेश कृष्णन या तिघांना चौकशीसाठी बोलावले पोलिसांना या तिघांवर संशय होता मात्र जबाब घेऊन त्यांना सोडून देण्यात आले होते त्यानंतर हे तिघेही पसार झाले. पोलीस तपासात या तिघांनी शैलेश मोरे यांचे हत्या केल्याचे निष्पन्न झाले. 

शैलेश मोरे हा संदीप कृष्णन यांच्या बहिणीचा पती होता मात्र  त्यांचा काडीमोड झाला होता. बहिणीशी शैलेश मोरे याने काडीमोड घेतल्याचा राग संदीप कृष्णन याला होता ,याच रागातून संदीप कृष्णन याने त्याचे साथीदार विनेश कृष्णन आणि प्रमोद यादव यांना बोलावलं.

शैलेश मोरे याला दारू पाजून त्याची दगडाने ठेचून हत्या केली.त्यानंतर शैलेश याचा मृतदेह कोपर डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर फेकून पळ काढला .त्यांनी रेल्वे अपघाताचा बनाव केला होता. मात्र रेल्वे पोलिसांच्या तपासात त्यांच्या या बनावाचा पर्दाफाश झाला. रेल्वे पोलीस तब्बल 28 वर्षांपासून या तिघांच्या मागावर होते यामधील संदीप कृष्णन हा बिहारला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तत्काळ तांत्रिक तपास तसेच बातमीदारांच्या आधारे संदीप कृष्णाचा ठाव ठिकाणे मिळवत सापळा रसत संदीप कृष्णाला बिहार येथून ताब्यात घेतले त्याचे दोन साथीदार अद्याप पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES