• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'कर्मचारी स्पेशल' लोकलची दारं आतून बंद करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी Bad News; आता प्रशासन Viral Video वरून...

'कर्मचारी स्पेशल' लोकलची दारं आतून बंद करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी Bad News; आता प्रशासन Viral Video वरून...

सोमवारी 9 तासांहून अधिक काळ मध्य रेल्वेची सेवा कोलमडलेली असतानाच दुसरीकडे ठाणे स्टेशनवर कर्मचारी विशेष लोकलचे दरवाजे बंद करुन ठेवल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणात आता कारवाई करण्याचे संकेत रेल्वेने दिले आहेत.

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 28, 2026, 08:28 AM IST|Updated: Oct 28, 2026, 08:33 AM IST
joinshare
'कर्मचारी स्पेशल' लोकलची दारं आतून बंद करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी Bad News; आता प्रशासन Viral Video वरून...
Image Credit: रेल्वे प्रशासनानं घेतला मोठा निर्णय

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

3

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

4

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

5

कुठे थंडीची चाहुल, तर कुठे वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल, वाचा अलर्ट

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सोमवारी (26 ऑक्टोबर रोजी) दिवसभर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईत नोकरीनिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवसभर मनस्ताप सहन करावा लागला. उशीराने म्हणजे अगदी कधीही धावणाऱ्या लोकल ट्रेन, प्रवाशांची प्रचंड गर्दी, ट्रॅकवरुन चालणारे प्रवासी असं चित्र सोमवारी दिवसभर पाहायला मिळालं. असं असतानाच दुसरीकडे खचाखच भरलेल्या ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर 'कर्मचारी विशेष लोकल' आल्यानंतर जो प्रकार घडला तो अजून धक्कादायक होता.

सर्वसामान्य प्रवाशांना आत येऊ देण्याऐवजी या ट्रेनमध्ये बसलेल्यांनी आतून दारं लावून घेतली. त्यामुळे इतर लोकलमध्ये अगदी जीवावर उदार होऊन दारात लटकून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवेश नाकारल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना एवढा त्रास होत असताना अशा दिवशी रेल्वे कर्मचारी विशेष लोकल सोडण्याची गरज काय होती? असे प्रश्नही उपस्थित झाले. यावरुन संताप व्यक्त होत असतानाच रेल्वे प्रशासनाने या साऱ्या प्रकारची दखल घेतली असून ऑडिओ व्हिडीओंच्या आधारे दारं बंद करुन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख पटवली जाणार असल्याचं रेल्वेनं जाहीर केलं आहे. तसेच या प्रकरणातील दोषींविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.

सोमवारी सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरशी संबंधित तांत्रिक बिघाड झाल्याने, मध्य रेल्वेची लोकल सेवा नऊ तासांहून अधिक काळ कोलमडली होती. सामान्य गाड्याच वेळेत चालत नसताना मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी सोडली जाणारी 'कर्मचारी विशेष लोकल' चालवण्यात आली. परळवरुन दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोडलेली कल्याणच्या दिशेने धावणारी कर्मचारी विशेष लोकल ऑफिस सुटण्याच्या वेळी म्हणजेच पावणेपाच-पाचच्या आसपास ठाणे स्थानकात आली. या लोकलच्या डब्यात मोजकेच कर्मचारी बसले होते. तशी लोकल बऱ्यापैकी रिकामीच होती. काही कर्मचारी तर सीटवर आरामात झोपले होते.

Mumbai commuters were stranded, but an allegedly empty staff-only local reportedly refused to open its doors to them. In a crisis, shouldn’t humanity come first? #MumbaiLocal #CentralRailway https://t.co/0qWOicQ5qG

— Mumbai Heritage (@mumbaiheritage) October 27, 2026

काळ-वेळ आणि झालेला खोळंबा लक्षात घेता सदर लोकलमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करू देणे आवश्यक होते. मात्र ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आलेल्या कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या कर्मचारी विशेष स्लो लोकलच्या एका डब्याचे दरवाजे आतून बंद करण्यात आले होते. प्लॅटफॉर्मवर तुडुंब गर्दी असताना तब्बल दोन ते तीन मिनिटं हा दरवाजा उघडण्यात आला नाही. प्लॅटफॉर्मवरील प्रवाशी आरडाओरड करुन दरवाजा उघडण्याची विनंती करत होते. मात्र त्यानंतरही त्यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिल्याचं दिसून आलं. काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी दरवाजाला आजून दोरी बांधून ते बंद करुन ठेवले. प्लॅटफॉर्मवरील प्रवाशी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतानाच डब्यातील कर्मचाऱ्यांनी आतून दरवाजा धरुन ठेवला होता. आता याच प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.

Mumbai local commuters already battle overcrowding every day. Now they allegedly have to plead with railway staff just to get a coach door opened At Thane station, a frustrated passenger reportedly threw water at a locked coach door after being ignored for 2–3 minutes What exactly was the reason for keeping the doors locked? Central Railway owes commuters an explanation https://t.co/Vsyrr6ZB9X

— SaffronSoul (@TheRealDharm) October 26, 2026

 

यावरुन संताप व्यक्त होत असून सोशल मीडियावरुन टीकेची झोड उठवली जात आहे. या साऱ्या गोष्टींची दखल घेत आता रेल्वे प्रशासनानेच मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवरुन दार न उघडणाऱ्या आणि ते बंद करुन ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु केलं आहे. चौकशीदरम्यान दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार करावाई करण्यात येईल अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Railway News
Mumbai