SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

Explainer : लॉरेन्स टोळीचे गुंड महाराष्ट्रातील 50 तुरुंगांमध्ये बंद; टोळीसाठी मुंबई आणि पुणे हॉटस्पॉट कसं बनले?

अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील कलाकार धास्तावले आहेत. कारण यापूर्वीही लॉरेन्स बिश्नोई टोळीने सेलिब्रिटी आणि व्यावसायिकांना धमक्या दिल्यामुळे पोलिसांच्या टार्गेटवर आहे. लॉरेन्स टोळीसाठी मुंबई आणि पुणे हॉटस्पॉट कसं बनले?

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 21, 2026, 07:08 PM IST | Updated: Oct 21, 2026, 08:14 PM IST
Image Credit: lawrence bishnoi gang
Join

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी 18 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता जुहू परिसरात कारवर गोळीबार करण्यात आला. या थरारक हल्ल्यामध्ये टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला आहे. पण टायगर श्रॉफचा ड्रायव्हर आणि एक चाहत्या गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली असून बुधवारी तिघांना मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. त्या तिघांना कोर्टाने 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर टायगर श्रॉफवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईच्या सदस्याने या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे. अनिल पंडित याने सोशल मीडियावर एक पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यासोबत या ऑडिओ क्लिपमधून सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

दुसरीकडे टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा पोलिसांचा तपास जसा जसा पुढे जातोय, धक्कादायक खुलासे होत आहे.  चौकशीदरम्यान अशी माहिती समोर आली आहे की, या हल्लेखोरांनी  ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेता सलमान खान, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेता आमिर खान यांच्या घराची रेकी केली होती. यामुळे बॉलिवूडमध्ये भीतीदायक वातावरण आहे. अनिल पंडित याने ऑडिओ क्लिपमधून संपूर्ण बॉलिवूडला लक्ष्य केलं आहे. जो सलमान खानसोबत काम करेल त्याचा संपवून टाकू अशी धमकी दिली आहे. यानंतर लॉरेन्स बिश्नोईची बॉलिवूडसह देशात दहशत पसरली आहे. महत्त्वाचे म्हणजे लॉरेन्स बिश्नोई टोळी देशभरातील अनेक राज्यांमध्ये दहशत पसरवण्याचा कायम प्रयत्न करत असतात. पण या गँगचे सर्वात जास्त लक्ष्य हे मुंबई आणि पुणे शहर असतं. गेल्या दोन वर्षांमध्ये 10 हून अधिक घटनांची या दोन शहरांमध्ये पोलिसांकडे नोंद झाली आहे. मुंबई हे हाय प्रोफाईल सेलिब्रिटी आणि पुण्यात व्यावसायिक हे लॉरेन्स बिश्नोईच्या कायम लक्ष्यावर असतात. दुसरीकडे लॉरेन्स टोळीचे गुंड महाराष्ट्रातील 50 तुरुंगांमध्ये बंद आहेत. 

पोलिसांच्या अधिकृत गुन्हेगारी अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 2024 - 2026 दरम्यान लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित 10 हून अधिक खंडणीचे गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे. या अहवालानुसार या सर्व प्रकरणात  परदेशात असलेले सूत्रधार, स्थानिक संपर्क आणि इतर राज्यांतून भाड्याने घेतलेल्या शूटर्सची भूमिका समोर येते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अनेक प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हस्तक, शुभम लोणकर याचं नाव समोर येतं. 

मुंबई आणि पुण्यातील प्रमुख घटना

14 एप्रिल 2024 - सलमान खानच्या वांद्रे इथल्या घरावर गोळीबार

गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेनेमहाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लागू केला. या प्रकरणातील आरोपपत्रात लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई आणि इतर आरोपींची नोंद आहे. 

12 ऑक्टोबर 2024 -  बाबा सिद्दीकी हत्या


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपत्रात पुण्यातील आरोपी अनमोल बिश्नोई आणि शुभम लोणकर यांचा हात असल्याची नोंद केली आहे. 

मे 2026 - पिंपरी-चिंचवडमधील फर्निचर मॉलमध्ये गोळीबार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्यावसायिकाच्या व्यावसायिक भागीदाराकडून कथितरित्या 2 कोटींची खंडणी मागली होती. त्यानंतर एजे फर्निचर मॉलमध्ये सहा गोळ्या झाडण्यात आल्या. या प्रकरणाचीही बिश्नोई टोळीने जबाबदारी घेतली होती. 
 

22 जून 2026 - फुरसुंगी इथे व्यावसायिकाच्या गोदामावर गोळीबार 


पुण्यातील फुरसुंगी परिसरात एका व्यावसायिकाच्या गोदामाबाहेर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात व्यावसायिक आणि त्याच्या नऊ व्यावसायिक भागीदारांकडून 50 कोटींची खंडणी उकळल्याचा आरोप पोलिसांच्या तक्रारीत नोंद आहे. 

1 फेब्रुवारी 2026 - जुहू इथे रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार


रोहित शेट्टीच्या घरावर पाच गोळ्या फायरिंग करण्यात आली होती. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, टोळीचे वर्चस्व आणि मुंबईला हादरवण्यासाठी हा हल्ला झाला होता.

18 ऑक्टोबर 2026 - जुहू इथे टायगर श्रॉफच्या गाडीजवळ गोळीबार

टायगर श्रॉफच्या कारवर दोन अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. त्यात अभिनेता सुखरूप आहे. पण यात एक चाहता आणि टायगरचा ड्रायव्हर जखमी झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. 


लॉरेन्स गँगकडून या सेलिब्रिटींना धमक्या!

 

  1. सलमान खान
  2. रणवीर सिंग
  3. आमिर खान
  4. रोहित शेट्टी
  5. आयुष शर्मा
  6. कपिल शर्मा
  7.  मुनवर फारुकी 
  8. टायगर श्रॉफ

दरम्यान पंजाब आणि हरियाणातील अनेक प्रसिद्ध गायकांनाही धमकीचे फोन गेले आहेत. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES