SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आईचं दूध बाळासाठी अनिवार्य, अशी सूचना पॅकेजवर देणं बंधनकारक; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी काढला आदेश, वाचा यामागील कारणं

सहा महिन्यापर्यंत आईच्या दूधाशिवाय कोणतंही अन्न देणं अपेक्षित नाही. हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे असं अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Sep 29, 2026, 06:41 PM IST | Updated: Sep 29, 2026, 06:46 PM IST
Join

आईचं दूध सर्वोत्तम दूध ही सूचना अनिवार्य आहे. ही सूचना समोर हवी आणि अगदी महत्त्वाची असं लिहिलेलं असावं असा आदेश अन्न व औषध प्रशासनाने काढला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे. सहा महिन्यापर्यंत आईच्या दूधाशिवाय कोणतंही अन्न देणं अपेक्षित नाही. हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. यामध्ये पुरवठा साखळीतील सर्वजण, कंत्राटदार, उत्पादन करुण घेणारा ब्रँडमालक, आयातदार, वितरक, किरकोळ विक्रेत, दुकानं, रुग्णालयांना पुरवठा करणारे, ई-कॉमर्स यांचा समावेश आहे अशी माहिती त्यांनी दिली.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला त्यांनी सांगितलं की, "हॉटेल्स, दूध उत्पादन, शाळेतील आहाराबाबतीत आणि इतर अशा 11 ऑर्डर काढल्या आहेत. शाळेतील डायट ऑर्डर काढली आहे, त्याची अंमलबजावणी सुरु आहे. 22 महिन्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांसाठी तो आदेश आहे. मग 2 वर्षांपर्यतच्या मुलांचं काय? असा प्रश्न निर्माण होतो. अंगणवाडीत जाणाऱ्यांसह त्यांच्या आधीच्या मुलांचीही काळजी घेणं महत्त्वाचं आहे".

पुढे त्यांनी सांगितलं की, "नवीन जन्माला आलेली बाळं ते 2 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी त्यांना जे अन्न किंवा पर्यायी अन्न दिलं जातं त्याबद्दल काही नियम आहे. अन्न व्यावसायात काम करणाऱ्यांना हा कायदा लागू आहे. तसंच उत्पादक, स्टोअरर, वितरक, विक्रेते किंवा काम करणारे रुग्णालयं सर्वांना हा आदेश लागू आहे".

सहा महिन्यापर्यंत आईच्या दूधाशिवाय कोणतंही अन्न देणं अपेक्षित नाही

"2 वर्षांखालील बालकांना त्यांना पिशवीतून देण्यात येणारं प्रत्येक उत्पादन, 6 महिन्यापासून 2 वर्षांपर्यंत दिलं जातं. सहा महिन्यापर्यंत आईच्या दूधाशिवाय कोणतंही अन्न देणं अपेक्षित नाही. हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे. ज्यामध्ये पुरवठा साखळीतील सर्वजण आहेत. कंत्राटदार, उत्पादन करुन घेणारा ब्रँडमालक, आयातदार, वितरक, किरकोळ विक्रेते, दुकानं, रुग्णालयांना पुरवठा करणारे, ई-कॉमर्स यांचा समावेश आहे," अशी माहिती त्यांनी दिली

या आदेशाचं कारण काय?


"ही ऑर्डर आताच का? यावर ते म्हणाले, आमच्या निरीक्षणात तपासणी केली असता ही गरज वाटली. शिशू अन्नासाठी विहित मानकं टाळण्यासाठी हेल्थ मिक्स, स्टेज फूट, न्यूट्रिशन पावडर अशा नावांनी विक्री होणारी उत्पादनं बाजारात आढळली. आईचं दूध सर्वोत्तम दूध ही सूचना अनिवार्य असतानाही दिली जात नसल्याचं आढळलं. हे मोठं उल्लंघन आहे. आईचं दूध सर्वोत्तम दूध ही सूचना अनिवार्य आहे. ही सूचना समोर हवी आणि अगदी महत्त्वाची असं लिहिलेलं असावं. ते बऱ्याच ठिकाणी आढळलं नाही. त्याचा परिणाम बालकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यांच्या वाढीसाठी ज्याची गरज आहे ते पोषणतत्वच त्यांना मिळताना दिसत नाही. हे अन्न कोणत्या वयापासून द्यावं हे सांगणारीही सूचना नाही. वॉर्निंग देणं अपेक्षित असून तेही सापडलं नाही," असंही त्यांनी सांगितलं.


इन्फ्लून्सर हे वापरून सांगू शकतं नाहीत की हे चांगलं आहे. या आदेशाच्या पाठीमागील मूळ तत्व बालक वाचू शकत नाहीत आणि पालक पॅकेज, डॉक्टरांवर विश्वास ठेवतात यामुळे कायद्याने उत्पादन नेमके काय असावे या गोष्टी विहित केल्या आहेत. त्याचं उल्लंघन जास्त सापडतं असंही ते म्हणाले.

शिशुचे स्तनपान  55.08 टक्क्यांवर

आहार पद्धती चुकीच्या दिशेने जात आहे. सर्वेक्षणातून समोर आलं आहे की, भारतात 6 महिन्यांखालील शिशुचे स्तनपान पाच वर्षांपूर्वी 63 टक्के होते आणि आता 55.08 टक्क्यांवर आलं आहे. शहरी भागात 52.08 टक्के स्तनपान केलं जात ग्रामीण भागात 75.02 टक्के आहे. ही अगदी उलट स्थिती आहे. प्रसूती झाल्यानंतर पहिल्या तासात केलं जाणार स्तनपान कमी होत चाललं आहे. शहरी भागात 50% माता मुलांना पहिल्या 1 तासात स्तन पान करत नाहीत. याचा परिणाम मुलांच्या वाढीवर होतो अशी माहिती त्यांनी दिली.

उच्च रक्तदाब मध्ये असणाऱ्या मुलांचे प्रमाण 35 टक्के

स्टंटिंग 29 टक्के महाराष्ट्रात आहे. उच्च रक्तदाब मध्ये असणाऱ्या मुलांचे प्रमाण 35 टक्के आहे. याचा संबंध स्तनपानाशी आहे. 35.01 टक्के मुलांमध्ये उच्च रक्तदाब सापडला आहे. 10 ते 19 वयोगटातील मुलांमध्ये मधुमेह हे 12.03 टक्के मुलांमध्ये सापडले. या वयोगटातील मुलांमध्ये हाय कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त आहे . आयएमएसचा ऍक्ट आहे त्या अनुषंगाने आपण काम करत आहोत 5 बाबी महत्वाच्या आहेत असं त्यांनी सांगितलं.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES