SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मागच्या 5 वर्षात ₹118170000000 कोटी कमी; BMC च्या फिक्स डिपॉझिटला कशी लागली गळती?; धक्कादायक माहिती!

मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत एफडीमधील पैसा कुठे खर्च झाला? याचा हिशेब जाहीर करण्याची अशरफ आझमी यांची मागणी आहे.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 23, 2026, 17:59 IST | Updated: Nov 23, 2026, 18:23 IST
Image Credit: बीएमसी
Join

देशातील सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक असलेल्या मुंबई महापालिका म्हणजेच बीएमसीच्या मुदत ठेवींमध्ये गेल्या पाच वर्षांत मोठी घट झालीय. 2021-22 मध्ये सुमारे 91 हजार 690 कोटी रुपये असलेल्या एफडी ऑक्टोबर 2026 मध्ये 79 हजार 873 कोटी रुपयांवर आल्या आहेत. म्हणजेच या कालावधीत 11 हजार 817 कोटी रुपयांची घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर एफडीमधून काढलेला पैसा नेमका कुठे खर्च झाला?, याची सविस्तर माहिती देणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी काँग्रेसने केलीय. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून हा मुद्दा उपस्थित केला आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

पाच वर्षांत एफडीमध्ये 11817 कोटींची घट

महापालिकेच्या मुदत ठेवी 2021-22 मध्ये 91690.85  कोटी रुपयांवर होत्या. मार्च 2026 अखेर हा आकडा 77905.39 कोटी रुपयांपर्यंत खाली आला. त्यानंतर 13 ऑक्टोबर 2026 रोजी एफडीमध्ये 79873.39 कोटी रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे ऑक्टोबरमधील आकडेवारीनुसार पाच वर्षांत 11817 कोटी रुपयांची घट झाली आहे. मात्र, मार्च 2026 पर्यंतची घट मोजल्यास ती 13785  कोटी रुपये होते.

काँग्रेसकडून श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी

एफडीमधून काढण्यात आलेला निधी कोणत्या प्रकल्पांसाठी वापरला, खर्चाला कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आणि प्रत्येक कामासाठी किती रक्कम खर्च झाली, याचा तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणी अशरफ आझमी यांनी केली आहे. 2021 पासून सप्टेंबर 2026 पर्यंतच्या आर्थिक व्यवहारांचा सविस्तर आढावा घेणारी श्वेतपत्रिका स्थायी समितीच्या पुढील बैठकीपूर्वी सादर करावी, अशी त्यांची मागणी आहे.

एफडी कमी होण्यामागे विकासकामांचा खर्च?

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एफडीमधील घटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कोविड काळात खर्च कमी झाल्यामुळे आणि विकासकांना दिलेल्या सवलतींमधून मिळालेल्या उत्पन्नामुळे 2021-22 मध्ये एफडी वाढल्या होत्या. त्यानंतर नियमित खर्च आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांवरील भांडवली खर्च वाढल्याने ठेवी कमी झाल्या. विशेषतः फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये 16071.40  कोटी रुपयांचा भांडवली खर्च झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

2.44 लाख कोटींच्या प्रकल्पांचा आर्थिक भार

महापालिकेवर 1 एप्रिल 2026 रोजी प्राधान्याच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी 2 लाख 44 हजार 552 कोटी रुपयांची बांधिलकी असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. हा निधी अतिरिक्त उत्पन्न, कर वसुलीतील सुधारणा, खर्चावर नियंत्रण, अंतर्गत निधी आणि गरज पडल्यास पर्यायी आर्थिक स्रोतांमधून उभारण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. एवढ्या मोठ्या प्रकल्पांसाठी निधी उभारताना महापालिकेच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम होणार नाही ना, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला.

जमीन आणि रुग्णालये देण्याच्या प्रक्रियेला विरोध

निधी उभारण्यासाठी महापालिकेच्या जमिनी आणि रुग्णालये इतर संस्थांना देण्याची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. एफडीतील घट आणि भविष्यातील आर्थिक जबाबदाऱ्या लक्षात घेता पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, सार्वजनिक शौचालये, रुग्णालये आणि शाळांसारख्या मूलभूत सुविधांच्या निधीवर परिणाम होऊ नये, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा पारदर्शक हिशेब जाहीर करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES