SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली आहे. सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 26, 2026, 20:24 IST | Updated: Nov 26, 2026, 20:30 IST
Join

Sanjay Raut On Supriya Sule : दिग्गज नेते शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शरद पवारांची पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची देखील चर्चा रंगली आहे. या चर्चेबबाबत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  सुप्रिया सुळे  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. 

राज्याला लवकरच पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. वृत्त एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या वृत्तामुळे या चर्चेला जोर आला आहे. शरद पवार राजकारणातून निवृत्ती घेऊ शकतात. यानंतर सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होऊ शकतात असा दावा या वृत्तपत्रात करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय आहे. या सर्व चर्चामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्थिरता  निर्माण झाली आहे. 

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांवर संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्यास त्यांच्या शपथविधी सोहळ्याला राहणार का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. सुप्रिया सुळे महायुतीच्या मुख्यमंत्री झाल्यास मी त्यांच्या शपथविधी सोहळ्याला जाईल. त्यांनी शपथ तर घेऊ द्या मी स्वतः शपथविधी ला हजर राहिन असं संजय राऊत म्हणाले.  भाजपच्या दिलदारीवर संजय राऊत यांनी उपरोधिक टीका केली आहे. उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील असंही त्यांनी नमूद केलं.

सुप्रिया सुळे पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या तर विक्रम होईल.  10 आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्री पद दिले तर मोछा दिलादारपणा ठरेल.  यावर पक्षात चर्चा होईल आणि उद्धव भूमिका घेतील. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्या तर आनंद आहे, स्वागत केले पाहिजे असं संज राऊत म्हणाले. 

यावर सुप्रिया सुळेंनाच पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची चर्चा फेटाळून लावली आहे. 12 वर्षापासून ऐकतेय मी मुख्यमंत्री होणार, माझ्यावर अन्याय करू नका असं मिश्किल विधान केले आहे. ज्यांच्याकडे संख्याबळ त्यांचाच मुख्यमंत्री बनतो.  मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर सुळेंनी हे विधान केले.  लोकांनी मला काम करायला संसदेत पाठवल आहे.  मी गॉसिपमध्ये वेळ घालवत नाही असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES