टायगर श्रॉफवर गोळीबार होत असताना महिलेचा LIVE व्हिडिओ, एकाचवेळी हजारो लोक पाहत होते, नेमकं काय घडलं?
टायगर श्रॉफवर गोळीबार झाला तेव्हा अनेक प्रत्यक्षदर्शी तेथे उपस्थित होते. हा संपूर्ण घटनाक्रम अनेकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मुंबई क्राईम : बॉलिवूडमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला आहे. टायगर फुटबॉल मॅच खेळून घरी जात असताना जुहू परिसरात 3 अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये टायगर श्रॉफ सुखरुप आहे, मात्र टायगरच्या चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाले आहेत. टायगर श्रॉफवर गोळीबार होत असताना महिलेचा LIVE व्हिडिओ सुरु होता. ही महिलाच या प्रकरणातील सर्वात महत्वाची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे.
टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याने बॉलिवूड हादरला आहे. टायगर श्रॉफवर ज्यावेळी गोळीबार झाला तेव्हा अनेक प्रत्यक्षदर्शी तेथे उपस्थित होते. टायगरला भेटण्यासाठी अनेक चाहते उपस्थित होते. यावेळी एक महिला देखील येथे उपस्थित होती. या महिलेची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी व्हॉग बनवत होते. टायगर त्याची कार घेवून बाहेर पडला तसा मी कॅमेरा ऑन केला. यावेळी अचानक गोळीबाराचा आवाज आला. सर्वांना वाटले दिवाळीचे फटाके फुटत आहेत. पण, एका तरुण टायगरच्या कारवर गोळ्या झाडत होता. गोळीबारात त्याचा ड्रायव्हर जखमी झाला. टायगरने डोकं खाली केले त्यामुळे तो वाचला. गोळीबार करणारा तरुण अत्यंत सर्वसाधारण शरीरयष्टीचा होता. दोघेजण होते. मात्र, मी एकालाच पाहिले असे प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले.
टायगरच्या कारवर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर बाईकवर बसून पळून गेले. टायगरच्या ड्रायव्हरला गोळी लागली. रस्त्यानर रक्त पडले होते. यानंतर टायगर स्वत: ड्रायव्हिग सीटवर आला. त्याने त्याच कारमधून तात्काळ जखमीला रुग्णालयात नेले असे देखील प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले.
घटना घडली तेव्हा या महिलेचे लाईव्ह व्हिडिओ सुरु होता. मात्र, हा LIVE व्हिडिओ सोशल मिडियावरुन हटवण्यात आला आहे. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं? संपूर्ण घटनाक्रम
जुहू येथे मैदानावरून बाहेर पडत असताना टायगर श्रॉफच्या कारवर अज्ञात व्यक्तीचा गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर 3 ते 4 गोळ्या झाडल्या
गोळीबारात टायगर श्रॉफ पूर्णपणे सुरक्षित असल्याची मुंबई पोलिसांची माहिती.
प्राथमिक माहितीनुसार, टायगर श्रॉफला पाहण्यासाठी मैदानाबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी
गर्दीचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोराचा टायगरच्या कारच्या दिशेने गोळीबार केला
घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल
संपूर्ण परिसराची नाकेबंदी
हल्लेखोर संशयित गर्दीत कसा निसटला, याचा शोध सुरु
पोलिसांकडून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू