SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मोठी बातमी! सोमवारी महाराष्ट्रात रिक्षा सेवा बंद; नेमकं कारण काय?

अख्ख्या महाराष्ट्रात सोमवारी रिक्षा सेवा बंद राहणार आहे, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 22, 2026, 19:33 IST | Updated: Nov 22, 2026, 19:55 IST
Image Credit: rickshaw protest
Join


आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (23 नोव्हेंबर) ऑटो रिक्षा चालक संपावर जाणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी या संपाबद्दल माहिती दिली. ऑटो रिक्षा चालक संपाचा सर्वाधिक फटका मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरसह अनेक शहरांमधील प्रवाशांना बसणार आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने असंख्य लोकांना कामावर जाण्यासाठी ऑटो रिक्षा वापरतात. त्यासोबत अनेक छोट्या मोठ्या कामासाठीही प्रवाशी ऑटो रिक्षाचे वापर करतात. अशात सोमवारी या प्रवाशांचा नाहक हाल होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात रिक्षा सेवा का जाणार संपावर?

ऑटो रिक्षा संघटनांचा आरोप आहे की, रॅपिडोद्वारे चालवली जाणारी बाईक टॅक्सी सेवा हे या संपाचे मुख्य कारण आहे. महाराष्ट्रात या प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवेसाठी आवश्यक परवानग्या घेतल्या गेल्या नाही येत. त्याशिवाय  नियमांचे पालन करण्यात येत नाही. संघटनांनी बाईक टॅक्सी चालकांची कागदपत्रे, वाहन नोंदणी, बॅज आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विविध ऑटो रिक्षा संघटनांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत रिक्षा बंदची घोषणा केली आहे.

हेसुद्धा वाचा -  डोंबिवलीत खळबळ! 8 वर्षाचं रिलेशनशिपनंतर ब्रेकअप, गर्लफ्रेंडसह तिचे आई-वडील घरात असताना बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य

शिवसेना अध्यक्ष संजय नाईक या पत्रकार परिषदेत म्हणाले की, राज्यातील अनेक शहरांमध्ये यासाठी आवश्यक परवानग्या उपलब्ध नसतानाही रॅपिडोच्या माध्यमातून बाईक चालवण्यात येत आहे. तर पूर्वीच्या तुलनेत व्यवसायात तब्बल 75 ते 80 टक्क्यांची घट झाल्यामुळे रोजचा खर्च भागवणेही कठीण झालंय. पेट्रोल, एलपीजी आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींमुळे खर्च वाढत असताना कमाई कमी झाल्यामुळे रिक्षाचालक संकटात सापडले आहेत. मुंबईसह पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरु असून याचा फटका रिक्षा चालकांना बसणार आहे.

संजय नाईक पुढे म्हणाले की, कायद्यानुसार कोणत्याही वाहनाला प्रवासी वाहतूक करायची असेल तर त्या ड्रायव्हरकडे बॅच असणे आवश्यक आहे. पण रॅपिडोच्या दुचाकी चालकांकडे अशा कुठल्याही प्रकारचा बॅच नाही. आमची टॅक्सी ही मुंबईतच प्रवास करु शकते. म्हणजे टॅक्सी मुंबईच्या बाहेर जाणार नाही. पण रॅपिडो ही मुंबईवरून थेट नाशिक असो किंवा पुणे कुठेही जाऊ शकते. तसंच प्रवासी वाहतूक करणारी गाडीला पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असते. पण या लोकांना अशी कुठलीही नंबर प्लेट नाही. त्यामुळे या अवैध प्रवासी वाहतूक कायमची बंद करावी, अशी आमची पहिली मागणी आहे. 

पुण्यातील सर्व रिक्षा संघटनांनी रॅपिडो बाईक टॅक्सीविरोधात राज्यव्यापी संप पुकारला आहे. कर्नाटकात पिवळ्या नंबर प्लेटच्या रॅपिडो बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पांढऱ्या नंबर प्लेटच्या खासगी दुचाकींचा व्यावसायिक वापर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी ११ वाजता पुणे आरटीओ कार्यालयासमोर रिक्षाचालक आंदोलन करणार आहेत. या संपाचा प्रवाशांवर होणारा परिणाम आणि संघटनांची भूमिका याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES