SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

ऑक्टोबर हिटनंतर नागरिकांना दिलासा मिळणार, महाराष्ट्रात थंडीची लाट येणार, पण...

मुंबईत ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच दिवसाच्या उकाड्याबरोबर रात्रीच्या उकाड्यातही वाढ नोंदली जात होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि उपनगरातील किमान तापमानात मागील काही दिवसांच्या तुलनेत घट झाली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 29, 2026, 11:06 AM IST | Updated: Oct 29, 2026, 11:08 AM IST
Image Credit: Winter alert in maharashtra
Join

ऑक्टोबर महिना सरत आला आहे. नोव्हेंबर महिना सुरू होण्यास अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. त्यानंतर पहिल्याच आठवड्यात दिवाळी आहे. साधारणपणे दिवाळीत थंडीची चाहुल लागण्यास सुरुवात होते. मात्र यंदा एल निनोचा परिणाम यामुळं महाराष्ट्रातील हवामानावर त्याचा परिणाम दिसून येईल. महाराष्ट्रात यंदा पावसाची मोठी तूट होती. तसंच, थंडीवरही परिणाम होणार आहे. मुंबईकरांना थंडीसाठी थोडी आणखी वाट पाहावी लागणार आहे. दिवाळीनंतर थंडीची पहिली लाट येण्याची चिन्हे आहेत.

ऑक्टोबरमध्येच उष्णतेच्या लाटां निर्माण झाल्या होत्या. त्यामुळं राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली होती. वाढत्या तापमानामुळं नागरिक बेजार झाले होते. त्यामळं नागरिक मोठ्या आशेने थंडीची वाट पाहत होते. आता ऑक्टोबर हिट कमी होणार आहे. तर गारवा वाढण्यास सुरुवात होणार आहे.

यंदा दिवाळीनंतर थंडीची पहिली लाट येण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र यंदा थंडीचा हंगाम कमी काळ टिकण्याची शक्यता आहे. मध्येच पुन्हा उष्णता वाढू शकते. दिलासादायक बाब म्हणजे ऑक्टोबरमध्ये जाणवणारा उकाडा आता संपला आहे.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुंबईत अनेकदा चांगली थंडी जाणवली होती. मात्र डिसेंबर आणि जानेवारीत थंडीचा जोर कमी होता. यंदाही थंडी कधी सुरू होणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. दिवाळीनंतर गारवा वाढण्याची शक्यता असली, तरी यंदा सलग अनेक दिवस थंडी राहीलच, याची शक्यता कमी आहे. एकूणच, ऑक्टोबरचा उकाडा कमी होण्यास सुरुवात झाली असली, तरी मुंबईकरांना थंडीसाठी दिवाळीनंतरच वाट पाहावी लागणार आहे. यंदा थंडी अधूनमधून जाणवेल; मात्र ती फार काळ टिकेलच असे नाही, असंही हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.

पुण्यात पहाटे गारवा दुपारी उन्हाचा चटका....

गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उकळल्यानंतर पुणेकरांना आता थंडीची चाहूल लागली आहे त्यामुळे गेली दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात पहाटे आणि रात्रीच्या वेळी काहीसा गारठा जाणवत आहे. कमाल तापमानातही घट होत असल्याने पुणेकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळत आहे. मात्र ही हुडहुडी फार काळ टिकणार नसून पुढील दोन ते तीन दिवसात पुन्हा तापमान वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढला

नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढला असून किमान तापमान 14.3अंशांवर पारा पोहोचला आहे.  28 ऑक्टोबरचे तापमान गेल्या 5 वर्षांतील नीचांकीवर पोहोचले आहे. दिवसा ऑक्टोबर हीटचा तडाखा, रात्री मात्र हुडहुडी अशी सध्या नाशिककरांची अवस्था आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES