SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मोठा दिलासा! जात वैधता प्रमाणपत्र आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार, पू्र्ण प्रक्रिया ऑनलाइन; पण ही अट कायम!

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. नागरिकांना आता जात प्रमाणपत्रासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे घालावे लागणार नाहीत.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 26, 2026, 07:17 IST | Updated: Nov 26, 2026, 07:21 IST
Image Credit: Maharashtra made caste validity certificate verification online how to apply
Join

सरकारी कागदपत्रे मिळवण्यासाठी कार्यालयात सारखे हेलपाटे घालावे लागतात. त्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होऊन तुमच्या हाती कागदपत्रे पडतात. मात्र आता महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. जात वैधता प्रमाणपत्र आता ऑनलाइन स्वरुपात मिळणार आहे. पडताळणीची प्रक्रिया संपूर्ण ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या नव्या नियमांनुसार जात प्रमाणपत्रासाठीचे अर्ज, आवश्यक कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे ऑनलाइन सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ई-मेल किंवा व्हॉट्सअॅपवर प्रमाणपत्र मिळणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या सहकार्याने आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) तांत्रिक सहकायनि जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्जदारांना आवश्यक कागदपत्रांच्या प्रती कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने सादर कराव्या लागत होत्या. मात्र आता  या प्रणालीच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. तसंच, अर्जदारांना अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन पाहता येणार असून, सुनावणीही आवश्यकतेनुसार व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जाणार आहे तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित चॅटबॉटच्या माध्यमातून अर्जदारांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

ही अट कायम

दरम्यान,  जात वैधतेसाठीचा अर्ज केवळ ऑनलाइन स्वीकारला जाणार आहे. त्यामुळं अन्य कोणत्याही मार्गाने सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जदारांना मूळ किंवा प्रमाणित कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. नोंदींसंदर्भातील आणि मानीव दिनांकापूर्वीच्या जात रहिवासासंदर्भातील प्रत्येकी किमान एक दस्तऐवज पुरावा सादर करणे आवश्यक आहे. असा पुरावा उपलब्ध नसल्यास स्वयंघोषणापत्र सादर करता येईल. आवश्यकतेनुसार समिती अतिरिक्त पुराव्यांची मागणी करू शकते.

60 दिवसांचे उद्दिष्ट

पडताळणी समिती 60 दिवसांच्या आत निर्णय घेणार

कुठे करायचा अर्ज

https://cvc.barti.in/home

वैधता प्रमाणपत्रासाठी सुधारित शुल्क

शैक्षणिक प्रयोजन- 100
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक- 500
शहरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक-1,000
सेवाविषयक प्रयोजन- 1,000
इतर शासकीय योजना व सलवती- 1,000

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES