• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /थंडीची चाहूल लागणार? आज कसं असेल महाराष्ट्राचं हवामान? कोकण, मध्य महाराष्ट्रात...

थंडीची चाहूल लागणार? आज कसं असेल महाराष्ट्राचं हवामान? कोकण, मध्य महाराष्ट्रात...

दिवाळीच्या पहिल्या दिवशी थंडी असणार का? जचे हवामान वाचा जसेच्या तसे

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 07, 2026, 07:01 AM IST|Updated: Nov 07, 2026, 07:03 AM IST
joinshare
थंडीची चाहूल लागणार? आज कसं असेल महाराष्ट्राचं हवामान? कोकण, मध्य महाराष्ट्रात...
Image Credit: maharashtra weather today

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
अभिनेता तुषार कपूर, आयुष्मान खुरानाला धमकी देणारा अटकेत, पण समोर आली हादरवणारी माहिती, लॉरेन्स गँगशी संबंधच नाही...

अभिनेता तुषार कपूर, आयुष्मान खुरानाला धमकी देणारा अटकेत, पण समोर आली हादरवणारी माहिती, लॉरेन्स गँगशी संबंधच नाही...

2

'प्रत्येक कृतीचा हिशोब ठेवला जाईल, येणारा काळ...'; खुर्चीसाठी स्टेजवरील अपमान नाट्यानंतर रामदास कदमांना सुनील तटकरेंच्या मेव्हण्याचा इशारा

3

कल्याण-डोंबिवलीत एकच खळबळ! ₹10 लाखांचं बक्षीस असलेला नक्षलवादी ठाकुर्लीत सापडला; ATS ला सिक्रेट माहिती मिळाली अन्...

4

पुणे हादरले! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रक्ताने माखलेली गोण, उघडून बघितल्यावर कर्मचारी हादरले, मानवी पाय...

5

माकडाकडून बॅग खेचताना नागपूरचा शिक्षक दरीत पडला; जागीच मृत्यू! मध्य प्रदेशमधील सहलीतला विचित्र घटनाक्रम समोर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर उन्हाचा चटका वाढला आहे. आकाश निरभ्र उन्हाची काहिली जाणवत आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानाचा चटका कायम असणार आहे. त्यामुळं उकाड्याने नागरिक हैराण होतील.

मुरासू चक्रीवादळ निवळल्यानंतर पूर्व तेलंगणा आणि आंध्र प्रदेश परिसरावर समु्द्र सपाटीपासून 4.5 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसंच, केरळच्या किनाऱ्यापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. चक्रीवादळामुळं राज्यातही पावसाला पोषक हवामान निर्माण झाले होते. मात्र आता पावसाची शक्यता नसल्याने राज्यात पुन्हा उन्हाचा चटका वाढणार आहे.

आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. किमान तापमानात चढ-उतार होत असल्याने हवामानात सातत्याने बदल होत आहेत. नोव्हेंबर महिना येऊन आठवडा लोटला तरीही अद्याप राज्यात कुठेच थंडीची चाहुल नाही. राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, मुंबईतील कुलाबा येथे राज्यातील उच्चांकी 36.9 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली आहे. तर, रत्नागिरी, सोलापूर येथे 36 अंशापेक्षा अधिक तर सांताक्रुझ, सांगली येथे 35 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.

कसं असेल हवामान?

मुंबई, कोकण- उष्ण व दमट वातावरण
पुणे, नाशिक- स्वच्छ आकाश, दिवसा उष्णता
मराठवाडा- कोरडे हवामान
विदर्भ- उन्हाचा चटका
पश्चिम महाराष्ट्र- प्रामुख्याने निरभ्र आकाश

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Weather News
Weather