• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पुणे हादरले! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रक्ताने माखलेली गोण, उघडून बघितल्यावर कर्मचारी हादरले, मानवी पाय...

पुणे हादरले! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रक्ताने माखलेली गोण, उघडून बघितल्यावर कर्मचारी हादरले, मानवी पाय...

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले मानवी पाय

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 07, 2026, 08:48 AM IST|Updated: Nov 07, 2026, 08:50 AM IST
joinshare
पुणे हादरले! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रक्ताने माखलेली गोण, उघडून बघितल्यावर कर्मचारी हादरले, मानवी पाय...
Image Credit: pune crime news

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे हादरले! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रक्ताने माखलेली गोण, उघडून बघितल्यावर कर्मचारी हादरले, मानवी पाय...

पुणे हादरले! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रक्ताने माखलेली गोण, उघडून बघितल्यावर कर्मचारी हादरले, मानवी पाय...

2

माकडाकडून बॅग खेचताना नागपूरचा शिक्षक दरीत पडला; जागीच मृत्यू! मध्य प्रदेशमधील सहलीतला विचित्र घटनाक्रम समोर

3

MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पदसंख्येत मोठी वाढ, कमाल वयोमर्यादेत बदल अन् परीक्षेची तारीखही जाहीर

4

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मनस्ताप; काही लोकल रद्द, असं असेल वेळापत्रक

5

'कोल्हापूर तडजोड न करता मस्ती उतरवतं, फक्त...'; 4 शासन नियुक्त सदस्यांच्या GR कॉपी शेअर करत सतेज पाटलांचा इशारा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळे गुरवमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मानवी पायाचे तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळं स्थानिकांमध्ये एक भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साधारण 11 वाजण्याच्या सुमाराल कृष्णा लोट आणि ओमकार काळे परिसरातील कचरा गोळा कऱण्यासाठी पोहोचले. याच दरम्यान त्याचे लक्ष रस्त्याच्या किनारी असलेल्या एका पोत्यावर गेली. पोत्यावर रक्ताचे डाग आढळल्यावर त्यांचा संशय बळावला.

सुरुवातीला त्यांना वाटलं की, पोत्यात कुत्र्याचे पाय असू शकतात. पण जेव्हा त्यांनी ते पोतं उघडून बघितलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्यात कोणत्या प्राण्याचे नाही तर मानवी पाय होते. गुडघ्याच्या खालून पाय कापण्यात आले होत. त्यानंतर दोघांनीही तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांना सूचना मिळताच सांगवी पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि परिसरात तपासाला सुरुवात केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पिंपळे गुरव मधल्या रामकृष्ण मंगल कार्यालय ते काटे पुरम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दोन मानवी पायाचे तुकडे आढळून आले आहेत. हे पाय पुरुष जातीच्या मृतदेहाचे असून ते नेमके कोणाचे आहेत, याबाबत अजून कोणतीही ओळख पटलेली नाही. हे पाय कोणाचे आहेत याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, हत्या करण्यात आल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे करुन दे विविध ठिकाणी फेकण्यात आले असावे, असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अद्याप या बाबत ठोस कोणताही पुरावा सापडला नाही. तसंच, हे पाय कोणाचे आहेत याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस उपआयुक्त संदीप अटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. तपासासाठी गुन्हे शाखेचे एक पथकही तैनात करण्यात आले आहे.

पुरावे शोधण्यासाठी घटनास्थळी श्वान पथकालाही बोलावण्यात आले आहे. श्वान पथकाच्या मदतीने पोलीस संशयिताचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या, पोलीस सापडलेल्या मानवी अवयवांची ओळख पटवून संपूर्ण घटनेमागील गूढ उकलण्याचे काम करत आहेत. हत्येची शक्यता किंवा इतर काही हेतू यासह प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास केला जात आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune News
crime
News in Marathi