• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /'कोल्हापूर तडजोड न करता मस्ती उतरवतं, फक्त...'; 4 शासन नियुक्त सदस्यांच्या GR कॉपी शेअर करत सतेज पाटलांचा इशारा

'कोल्हापूर तडजोड न करता मस्ती उतरवतं, फक्त...'; 4 शासन नियुक्त सदस्यांच्या GR कॉपी शेअर करत सतेज पाटलांचा इशारा

नुकत्याच झालेल्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या 'समविचारी आघाडी'ने 13 सदस्य निवडून आणले तर महायुतीचे एकूण 12 सदस्य निवडून आले. मात्र यानंतर सरकारच्या एका निर्णयाने नवीन राजकीय नाट्य सुरु झालं आहे.

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 07, 2026, 07:18 AM IST|Updated: Nov 07, 2026, 07:33 AM IST
joinshare
'कोल्हापूर तडजोड न करता मस्ती उतरवतं, फक्त...'; 4 शासन नियुक्त सदस्यांच्या GR कॉपी शेअर करत सतेज पाटलांचा इशारा
Image Credit: सतेज पाटलांनी सत्ताधाऱ्यांना केलं लक्ष्य (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे हादरले! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रक्ताने माखलेली गोण, उघडून बघितल्यावर कर्मचारी हादरले, मानवी पाय...

पुणे हादरले! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रक्ताने माखलेली गोण, उघडून बघितल्यावर कर्मचारी हादरले, मानवी पाय...

2

माकडाकडून बॅग खेचताना नागपूरचा शिक्षक दरीत पडला; जागीच मृत्यू! मध्य प्रदेशमधील सहलीतला विचित्र घटनाक्रम समोर

3

MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पदसंख्येत मोठी वाढ, कमाल वयोमर्यादेत बदल अन् परीक्षेची तारीखही जाहीर

4

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मनस्ताप; काही लोकल रद्द, असं असेल वेळापत्रक

5

'कोल्हापूर तडजोड न करता मस्ती उतरवतं, फक्त...'; 4 शासन नियुक्त सदस्यांच्या GR कॉपी शेअर करत सतेज पाटलांचा इशारा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच 'गोकुळ'च्या अध्यक्षपदावरुन वाद सुरु असतानाच राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट बैठकीदरम्यान, गोकुळवर चार शासन नियुक्त सदस्य नेमण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. या संदर्भातील शासन आदेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्याची माहिती शुक्रवारी रात्री समोर आल्यानंतर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी स्वत: या जीआरची प्रत आपल्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करत सरकारला थेट इशारा दिला आहे. 

गोकुळमध्ये झालंय काय?

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली 'समविचारी आघाडी'ने गोकुळच्या निवडणुकीमध्ये 13 सदस्य निवडून आणले तर महायुतीचे 12 सदस्य निवडून आले. मात्र अध्यक्षनिवडीच्या वेळेस महायुतीचे सदस्य अनुपस्थित राहिल्याने 14 सदस्यांचा पाठींब्याने होणारी अध्यक्ष निवड झाली नाही. याचसंदर्भातील तिढा सोडवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 10 नोव्हेंबरला गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचं ठरलं.  या निवडणुकीसाठी 25 निवडून आलेल्या संचालकांना नोटिसा बजावण्याचे निर्देशही देण्यात आले. मात्र, या न्यायालयीन लढाईदरम्यान राज्य सरकारने अचानक गोकुळमध्ये शासन नियुक्त 4 सदस्य निवडण्याचा निर्णय घेतला. यामुळे सतेज पाटील आणि काँग्रेससहीत सर्वच विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला. मात्र या निर्णयावर आता राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. 

सतेज पाटील संतापले

सन 2026 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 16 अंतर्गत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 19960 मध्ये सुधारणा करत या चार शासन नियुक्त सदस्यांना मान्यता देण्यात आल्यानंतर सतेज पाटलांनी याच शासन आदेशाची प्रत शेअर करत, "तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता?" असा सवाल सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

गोकुळ तुमची जहागीर नाही

"चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान ! घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही! लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट  पाहतं ! आता यायला लागतंय! कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा.. 9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता,दसरा चौक..." असं सतेज पाटलांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. 

तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही ! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता ? चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान ! घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही! लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं ! आता यायला लागतंय! कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा.. 9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता,दसरा चौक..

— Satej (Bunty) D. Patil (@satejp) November 6, 2026

रस्त्यावर उतरुन आंदोलन

सतेज पाटील यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याचसंदर्भात 9 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Satej Patil
Maharashtra Politics
Maharashtra News