• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पदसंख्येत मोठी वाढ, कमाल वयोमर्यादेत बदल अन् परीक्षेची तारीखही जाहीर

MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पदसंख्येत मोठी वाढ, कमाल वयोमर्यादेत बदल अन् परीक्षेची तारीखही जाहीर

MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारने दिवाळी गिफ्ट दिलं आहे. MPSCमार्फत घेण्यात येणाऱ्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 मधील पदसंख्येत वाढ करण्यात आली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 07, 2026, 08:07 AM IST|Updated: Nov 07, 2026, 08:11 AM IST
joinshare
MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पदसंख्येत मोठी वाढ, कमाल वयोमर्यादेत बदल अन् परीक्षेची तारीखही जाहीर
Image Credit: MPSC Group C Exam 2026

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे हादरले! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रक्ताने माखलेली गोण, उघडून बघितल्यावर कर्मचारी हादरले, मानवी पाय...

पुणे हादरले! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रक्ताने माखलेली गोण, उघडून बघितल्यावर कर्मचारी हादरले, मानवी पाय...

2

माकडाकडून बॅग खेचताना नागपूरचा शिक्षक दरीत पडला; जागीच मृत्यू! मध्य प्रदेशमधील सहलीतला विचित्र घटनाक्रम समोर

3

MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पदसंख्येत मोठी वाढ, कमाल वयोमर्यादेत बदल अन् परीक्षेची तारीखही जाहीर

4

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मनस्ताप; काही लोकल रद्द, असं असेल वेळापत्रक

5

'कोल्हापूर तडजोड न करता मस्ती उतरवतं, फक्त...'; 4 शासन नियुक्त सदस्यांच्या GR कॉपी शेअर करत सतेज पाटलांचा इशारा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026' ची वाट पाहणाऱ्या लाखो परीक्षार्थींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पहिली आनंदाची बातमी म्हणजे या परीक्षेतील पदसंख्येत राज्य सरकारने विक्रमी वाढ केली आहे. आता ही परीक्षा तब्बल 16,717 पदांसाठी घेण्यात येणार आहे. एवढंच नाहीतर  कमाल वयोमर्यादेत बदल करत विद्यार्थ्याना मोठा दिलासा दिला आहे. हो, कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे. याबद्दलची घोषणा अधिकृत  शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलं आहे.

स्पर्धा परीक्षेत अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह आणण्यासाठी 4 सप्टेंबर 2026 अन्वये उच्चस्तरीय समिती गठित केली गेली होती. या समितीने केलेल्या प्रमुख शिफारशीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

विद्यार्थ्यांना सरकारचे दिवाळी गिफ्ट

गेल्या वर्षभरात गट-क सेवा भरती प्रक्रियेतील पदसंख्येचा टप्प्याटप्प्याने बदल करण्यात आला. यापदाबद्दल पहिली जाहिरात ही 25 जून 2026 प्रसिद्ध झाली होती, ज्यात 2,619 पद होती. त्यानंतर पहिले शुद्धिपत्रक 22 जुलै 2026 यात 3,088 नवीन पदांचा समावेश करण्यात आला. आता राज्य सरकारच्या निर्णयानंतर 6 नोव्हेंबर 2026 या 11,010 पदांचा समावेश केल्यामुळे ही पदसंख्या आता 16,717 वर गेली आहे. या निर्णयाचा लाभ या परीक्षेतील सर्व पात्र उमेदवारांना मिळणार आहे.

त्यामुळे आता नव्याने अर्ज करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. त्यामुळे आता वाढीव पदांमुळे नवीन उमेदवारांना 13 ते 27 नोव्हेंबर 2026 या ठराविक तारखेत आयोगाच्या संकेतस्थळावर नव्याने अर्ज भरायचा आहे. तर ज्यांनी यापूर्वी अर्ज केला आहे, त्यांच्या विचार करून त्या अर्जात नवीन समाविष्ट संवर्गांसाठी विकल्प (Option Form) भरता येणार आहे. या विद्यार्थ्यांना नवीन अर्ज सादर करण्याची गरज नाही, असं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षा कधी असणार आहे?

पदसंख्या वाढवल्यामुळे परीक्षेच्या तारखेतही बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ही परीक्षा  3 जानेवारी 2027 घेण्यात येणार होती. पण आता ही परीक्षा  24 जानेवारी 2027 रोजी घेण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्व संवर्गांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा ऑफलाइन (OMR / ओएमआर) पद्धतीने 15 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहे. तर विशिष्ट शैक्षणिक अर्हता लागणाऱ्या नवीन संवर्गांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे, असं मुख्य परीक्षेबद्दल आयोगाने स्पष्ट केलं आहे. तर याबद्दल अभ्यासक्रम लवकरच एमपीएससीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असं आयोगाने सांगितलं आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
MPSC
Jobs News
Government Jobs