SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

थंडीचा कडाका वाढणार की कमी होणार? विदर्भात तापमान कमी होणार, जाणून घ्या आजचं हवामान

महाराष्ट्रात आजचे हवामान कसे राहणार? आज कसं असेल हवामान, जाणून घ्या

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 26, 2026, 09:09 IST | Updated: Nov 26, 2026, 09:10 IST
Image Credit: Maharashtra Weather update experiencing mostly dry weather with warm daytime temperatures and cooler mornings and nights
Join

महाराष्ट्रात तापमानात चढ-उतार होत आहेत. मागील आठवड्यात कडाक्यांचा थंडीचा अनुभव नागरिकांनी घेतला होता. मात्र आता थंडी कमी झाली असून उकाडा जाणवत आहे. आजपासून विदर्भाच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर, उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहणार आहे.

आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज नसून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. सर्वत्र आकाश निरभ्र राहणार असल्याने दिवसाच्या तापमानात उबदारपणा जाणवेल. शेतीच्या कामांसाठी हे हवामान अत्यंत पोषक ठरणार आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि कोकण परिसरावर समुद्र सपाटीपासून 3.1 किमी उंचीवर चक्रकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. त्यामुळं किमान तापमानात घट झाली असून उत्तर महाराष्ट्रात गारठा कामय आहे. तर, उर्वरित राज्यात उकाडा वाढला आहे. आजपासून विदर्भाच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, तळकोकणात  ऐन थंडीत अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील काही भागात सायंकाळच्या सत्रात अवकाळी पाऊस कोसळला. कालपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला होता.  अवकाळी पावसाने हवेत काही काळ गारवा निर्माण झाला होता.  मात्र ऐन थंडीच्या मोसमात अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. आंबा पिकाला मोहोर येण्याच्या वेळीच पाऊस आल्याने आंबा बागायतदार संकटात आले आहेत.

निफाड मध्ये तापमानांमध्ये चढ-उतार सुरू आहे. निफाड चा पारा 12.4 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे. आज पुन्हा पारा घसरल्याने थंडीची हुडहुडी वाढली आहे. पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू झाल्यामुळे थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. थंडीमुळे रब्बी हंगामातील गहू हरभरा पिकांना फायदा थंडीचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES