SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

चक्रीवादळामुळं ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रात पाऊस कोसळणार, या 7 जिल्ह्यांना अलर्ट, वादळी वाऱ्यासह पाऊस होणार

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळं राज्यात पाऊस होणार आहे. या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 30, 2026, 07:13 AM IST | Updated: Oct 30, 2026, 07:14 AM IST
Image Credit: maharashtra weather update
Join

बंगालच्या उपसागरातील अर्बण चक्रीवादळामुळं आज पुन्हा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासह, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळं या विभागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहिल. त्याचबरोबर कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने पहाटेच्या वेळी काहीसा गारवा जाणवतो. राज्यात काही ठिकाणी धुके आणि दव पडल्याचे निदर्शनास आले. पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाल्याने किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळं काहीशी थंडीची जाणीव होऊ लागली आहे.

विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह विजांसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळं येथे सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

अमरावतीत पावसाची रिपरिप

अमरावती शहरासह ग्रामीण भागामध्ये काल रात्रीपासून पावसाची रिपरिप वाढली आहे. त्यामुळं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या अर्णब चक्रीवादळाचा परिणाम यामुळं पाऊस झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस अशाच पद्धतीने पाऊस राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाला फायदा होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्व आणि ईशान्य भारतासह छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असून दक्षिण भारतात कमी पावसाचा अंदाज आहे.

अर्णब चक्रीवादळ निवळणार

अर्णब चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर छत्तीसगड, ओडिशामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. ही प्रणाली आता निवळणार असून वरील प्रणालीपासून दक्षिण कोकण आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES