मुंबई टी 1 विमानतळाचे पुनर्विकासाचे काम हाती घ्यायचं आहे. यासाठी टी 1 विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमान सेवा नवी मुंबई विमानतळावर हलवण्यात येणार आहे. तेव्हापासून विमान कंपन्यांनी नवी मुंबई विमानतळावरून उड्डाणासाठी नाराजी व्यक्त केली आहे. या विरोधात विमान कंपन्यांनी मुख्यमंत्र्यांनाही आपली परिस्थितीबद्दल सांगितलं. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे. या पत्रात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, कोणतीही विमानसेवा हलवू नका.
मुख्यमंत्र्यांनी पत्रातून स्पष्टपणे सांगितलं की, मुंबई विमानतळावरून नवी मुंबई विमानतळावर कोणतीही विमानसेवा हलवली जाणार नाही. मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांने सांगितलं की, विमान कंपन्यांच्या अडचणीसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी स्पष्ट केलं की, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणतीही विमानसेवा हलवली जाणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे विमान कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.
माहितीनुसार मुंबई विमानतळावरून 14 आंतरराष्ट्रीय शहरांची उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर हलवण्याचा प्रस्ताव देण्यात आला. यानंतर विमान कंपन्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला. त्यानंतर आता या प्रस्तावालाा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यासोबत त्यांनी या पत्रातून एक पर्यायही दर्शविला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रातून स्पष्टपणे सांगितलं की, मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ ही दोन्ही आपापल्या क्षमतेनुसार स्वतंत्रपणे कार्यरत राहतील. जर मुंबई विमानतळावरील टर्मिनल-1 च्या पुनर्विकास करण्यापूर्वी टर्मिनल-1B चं उभारणी करावी. त्यानंतर 1A वरील उड्डाणे 1B मध्ये हलवा, असा पर्यायी प्रस्ताव या पत्रातून देण्यात आला आहे.
या प्रस्तावानुसार नवी मुंबई विमानतळावरून बहरीन, दमाम, ढाका, दोहा, फुजैरा, जकार्ता, जेद्दा, काठमांडू, कुवेत सिटी, मदिना, मस्कत, रास अल खैमाह, रियाध आणि शारजाह या आंतरराष्ट्रीय विमानसेवा हलवण्याचा आहेत. तर ही सेवा उन्हाळी वेळापत्रक 2027 पासून या बदलांची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, या प्रस्तावाला अनेक विमान कंपन्यांनी विरोध दर्शविला आहे.