SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नवी मुंबईतील दोन सख्ख्या बहिणींना टार्गेट केलं, घरात घुसून तरुणाचा गोळीबार, कारण हादरवणारे

एका तरुणाने दोन बहिणींवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 06, 2026, 07:10 AM IST | Updated: Nov 06, 2026, 07:12 AM IST
Image Credit: navi mumbai firing
Join

प्रेमप्रकरणातून एका माथेफिरूने घरात घुसून दोन सख्ख्या बहिणींवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरुणी गंभीर जखमी झाली असून एक बहीण थोडक्यात बचावली आहे. प्रेमप्रकरणातून हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. संशयित अर्जुन चौहान याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कोपरखैरणे सेक्टर 1 येथे गुरुवारी रात्री घरात घुसून एका तरुणाने दोन सख्या बहिणींवर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना घडली. रात्री सुमारे नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेत तन्नू धोबी (२०) हिच्या पाठीत गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली, तर रितू धोबी (२२) हिच्या कानाला गोळी चाटून गेल्याने ती थोडक्यात बचावली आहे. या गोळीबारानंतर फरार झालेल्या आरोपी अर्जुन चौहान याला कोपरखैरणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धोबी कुटुंबीय कोपरखैरणे सेक्टर 1 मध्ये वास्तव्यास आहेत. गुरुवारी रात्री नितीन प्रदीप धोबी आणि त्याचे वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी घरात दोन्ही बहिणी आणि त्यांची आई उपस्थित होती.

रात्रीच्या सुमारास अर्जुन चौहान हा तरुण अचानक त्यांच्या घरात घुसला. त्याने दोन्ही बहिणींना लक्ष्य करून त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. या हल्ल्यात तन्नूच्या पाठीत गोळी लागली, तर रितूच्या कानाला गोळीचा स्पर्श झाला. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला.

या घटनेनंतर जखमी झालेल्या दोन्ही मुलींना त्यांच्या आईने तातडीने रुग्णालयात दाखल केले. तन्नूवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. रितूवरही उपचार करण्यात आले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, या गोळीबारामागे प्रेमप्रकरणाची पार्श्वभूमी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी संशयित अर्जुन चौहान याचा शोध घेऊन त्याला रात्रीच ताब्यात घेतले आहे. गोळीबारासाठी वापरलेले पिस्तूल, हल्ल्यामागील कारण आणि अन्य काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्जून चव्हाणचे मोठ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणाने तरुणीने त्यांचे नाते तोडले. तिच्यासोबत प्रेमसंबंध असलेल्या अर्जूनने रागात दोन्ही बहिणींवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात ती तरुणी आणि तिची 22 वर्षीय मोठी बहिण जखमी झाल्या. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES