SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

‘माझ्या जीवाला धोका, बिल्डरचे गुंड धमकावून घर रिकामी करायला लावतायत' मराठी अभिनेत्याने फडणवीस-शिंदेंकडे मागितली मदत!

मालाड पूर्वेतील पुष्पापार्क आणि बाणडोंगरी पुनर्विकासावर अभिनेता अभिजीत केळकरने गंभीर आरोप केलेयत. बिल्डरकडून धमक्या, घरांची तोडफोड आणि SRA पात्रतेवर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंकडे मदतीची मागणी केलीय.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Oct 31, 2026, 04:27 PM IST | Updated: Oct 31, 2026, 04:39 PM IST
Image Credit: अभिजित केळकर पोस्ट
Join

मराठी अभिनेता अभिजित केळकर याने मालाड पूर्वेतील पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून फेसबुक पोस्ट करत गंभीर आरोप केले आहेत. पुष्पापार्क आणि बाणडोंगरी परिसरातील रहिवाशांना बिल्डरकडून धमकावून घरे रिकामी करण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा त्याने आपल्या पोस्टच्या माध्यमातून केलाय. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्याने केलीय. गेल्या सहा महिन्यांपासून आपण या प्रश्नासाठी लढत असल्याचे अभिजित केळकरने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

मालाडमधील घरांबाबत नेमका आरोप काय?

मालाड पूर्वेतील पुष्पापार्क आणि बाणडोंगरी परिसरातील घरे अनेक कुटुंबांनी आयुष्यभराच्या कष्टातून उभी केली आहेत. मात्र, पुनर्विकासाच्या नावाखाली ही घरे पाडली जात असल्याचा आरोप केळकर यांनी केला. बिल्डरशी संबंधित व्यक्तींकडून स्थानिक रहिवाशांना धमक्या दिल्या जात असून, आवश्यक करार आणि कागदपत्रे न दाखवताच घरांची तोडकामाची कारवाई सुरू असल्याचे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘माझ्या जीवाला धोका आहे’

या प्रकरणाविरोधात आवाज उठवल्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याची भीती केळकरने व्यक्त केली. आपण कोणालाही घाबरत नसल्याचे सांगत, घरातून बाहेर पडताना आई, पत्नी आणि मुलांना याची कल्पना दिल्याचेही त्याने पोस्टमध्ये नमूद केले. असे असले तरी कोणत्याही बिल्डरचे किंवा लोकप्रतिनिधीचे नाव त्याने जाहीर केलेले नाही

 .

पुनर्विकासाच्या व्यवहार्यतेवर प्रश्न

प्रकल्पाच्या ठिकाणी पुरेशी रस्त्याची जोडणी नसल्याचा दावा करत अभिजित केळकरने बांधकाम साहित्य आणि यंत्रसामग्री तिथे कशी पोहोचणार, असा प्रश्न उपस्थित केला. जमीनमालकांची संमती किंवा एनओसी घेतली नसल्याचा आणि संबंधित जमीनमालक न्यायालयात गेल्याचा दावाही त्याने केला. याशिवाय जवळील संरक्षण विभागाच्या परिसरामुळे बांधकामाच्या उंचीवर निर्बंध असू शकतात, अशी शंकाही त्याने व्यक्त केली आहे.

SRA पात्रतेवरही आक्षेप

गेल्या 50 ते 60 वर्षांपासून राहणाऱ्या काही रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) प्रक्रियेत अपात्र ठरवण्यात आल्याचा आरोप अभिजित केळकरने केलाय

.

सरकारकडे लेखी हमीची मागणी

पुनर्विकासाला आपला विरोध नसून तो कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा, अशी भूमिका केळकर यांनी मांडली. पात्र रहिवाशांना हक्काची घरे मिळतील आणि अपात्र ठरवलेल्या कुटुंबांच्या प्रश्नावर तोडगा निघेल, याची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी लेखी घ्यावी, अशी मागणी अभिजित केळकरने केली आहे. त्याच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देऊन कारवाई करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES