• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /ना नरेंद्र मोदी, ना अमित शाह, मग कोण असेल भारताचा पुढचा पंतप्रधान? उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे मोठं वक्तव्य

ना नरेंद्र मोदी, ना अमित शाह, मग कोण असेल भारताचा पुढचा पंतप्रधान? उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे मोठं वक्तव्य

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन : भारताचा पुढचा पंतप्रधान कोण असेल याची चर्चा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण  जगभरात सुरु आहे. नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील अशी चर्चा आहे. तर, दुसरीकडे भाजपचे सर्वात दिग्गज नेते अमित शाह यांचे नाव देखील चर्चेत आले. अशातच उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी भारताचा पुढचा पंतप्रधान कोण असेल याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. त्यांनी नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांचा नान न घेतला एका तामिळनाडूमधूनही पंतप्रधान बनू शकतात असं वक्तव्य केले आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 31, 2026, 06:19 PM IST|Updated: Oct 31, 2026, 06:26 PM IST
joinshare
ना नरेंद्र मोदी, ना अमित शाह, मग कोण असेल भारताचा पुढचा पंतप्रधान? उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे मोठं वक्तव्य

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
दिवाळीआधी सोनं-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण! तुमचे किती रुपये वाचणार? जाणून घ्या नवे दर!

दिवाळीआधी सोनं-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण! तुमचे किती रुपये वाचणार? जाणून घ्या नवे दर!

2

दिवाळीसाठी चकली बनवायची? ही सोपी रेसिपी फॉलो करा, झंझटच नाही

3

मुंबईत IBPS मध्ये नोकरीची मोठी संधी अन् 14 लाखांचं पॅकेज; कुठे करायचा अर्ज?

4

ना नरेंद्र मोदी, ना अमित शाह, मग कोण असेल भारताचा पुढचा पंतप्रधान? उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे मोठं वक्तव्य

5

शाळेच्या वर्गात सहावीच्या चिमुरडीवर हल्ला! तिसरीतील विद्यार्थ्याचे कृत्य CCTV मध्ये कैद; शाळेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन : भारताचा पुढचा पंतप्रधान कोण असेल याची चर्चा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण  जगभरात सुरु आहे. नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील अशी चर्चा आहे. तर, दुसरीकडे भाजपचे सर्वात दिग्गज नेते अमित शाह यांचे नाव देखील चर्चेत आले. अशातच उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी भारताचा पुढचा पंतप्रधान कोण असेल याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. त्यांनी नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांचा नान न घेतला एका तामिळनाडूमधूनही पंतप्रधान बनू शकतात असं वक्तव्य केले आहे. 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पंतप्रधानपदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भविष्यात एक तमिळ व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतं असं उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. देशाच्या विविध भागांतील लोकांनी पंतप्रधानपद भूषवले आहे. भविष्यात तमिळनाडूतील एखादा नेता पंतप्रधान होऊ शकतो असं लक्षवेधी वक्तव्य.  उपराष्ट्रपतींनी केले आहे. कर्नाटकमधील व्यक्तीने देशाचे पंतप्रधानपद भूषवले आहे. आता गुजरातमधून पंतप्रधान आहेत भविष्यात एखादे तमिळ व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते असं ते म्हणाले.  

लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकात नेतृत्व करण्याची क्षमता असते. सध्या वेगवेगळ्या राज्यांतील नेते सर्वोच्च पदांवर आहेत. भविष्यात तामिळनाडूतील कोणीतरी पंतप्रधान होऊ शकतो असं उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन म्हणाले. 

मदुराई दौऱ्यावर उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी  पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान पदाबाबत लक्षवेधी वक्तव्य केले.  तामिळनाडूमधून आजपर्यंत कोणीही पंतप्रधान झालेले नाही. मात्र, सी.पी. राधाकृष्णन यांच्यासह तीन राष्ट्रपती आणि तीन उपराष्ट्रपती हे तामिळनाडूचे आहेत. यामुळे भविष्यात तामिळनाडूचा पंतप्रधान असला पाहिजे असं ते म्हणाले. 

सी.पी. राधाकृष्णन हे  1998 ते 2004 या काळात कोईम्बतूरचे भाजप खासदार होते.  राधाकृष्णन यांनी शुक्रवारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांच्यासमवेत मीनाक्षी सुंदरेश्वरर मंदिराला भेट दिली. उपराष्ट्रपती अर्लेकर आणि माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांनी मदुराईपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या पसुम्पोन या स्वातंत्र्यसैनिक आणि आध्यात्मिक गुरू मुथुरामलिंगम थेवर यांच्या जन्मस्थानी त्यांच्या स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण केला.

मीनाक्षी सुंदरेश्वरर मंदिराला भेट देताना, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी मदुराई, तामिळनाडू आणि संपूर्ण देशातील लोकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. तसेच, भारत भविष्यात जागतिक महासत्ता बनेल यावरही त्यांनी भर दिला. 

थलपथी विजय यांचे नाव पंतप्रधानासाठी चर्चेत

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या वक्तव्यानंतर  थलपथी विजय यांचे नाव पंतप्रधानासाठी चर्चेत आले आहे.  तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपथी विजय यांच्या चाहत्यांनी त्यांना पंतप्रधान बनवण्याची मागणी सुरू केली आहे. उपराष्ट्रपतींचे वक्तव्य हे भविष्यात देशाचे पंतप्रधान होणाऱ्या सी. जोसेफ विजय यांच्या संदर्भात थेट होते असा दावा विजय यांच्या समर्थकांनी केला आहे. विजय यांच्यामध्ये देशाचे पुढील पंतप्रधान होण्याची क्षमता आहे असं विजय यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Indian Politics
Political News
PM Narendra Modi
Amit Shah