• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /दादरनंतर आता राज्यभरातील मेट्रो स्थानकांच्या नामांतराचा मार्ग मोकळा? फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

दादरनंतर आता राज्यभरातील मेट्रो स्थानकांच्या नामांतराचा मार्ग मोकळा? फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मेट्रो स्थानकाच्या नामकरणासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरिय समिती गठीत करण्यात आली आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 19, 2026, 09:27 IST|Updated: Nov 19, 2026, 15:06 IST
joinshare
दादरनंतर आता राज्यभरातील मेट्रो स्थानकांच्या नामांतराचा मार्ग मोकळा? फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Image Credit: Metro station renaming in Maharashtra spans state-level committees

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

2

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

3

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

4

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

5

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबईतील दादर स्थानकाचे नाव चैत्यभूमी करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराची प्रक्रिया आगामी विधिमंडळ अधिवेशनात पूर्ण करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर आता मेट्रो स्थानकांच्या नामकरण आणि नामांतराचा मार्गही मोकळा झाला आहे. मेट्रो स्थानकाच्या नामकरणासाठी राज्य सरकारने समिती गठीत केली आहे.

मेट्रो स्थानकाच्या नामकरण आणि नामांतरासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरिय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती नामांतराचा किंना नामकरणाचा प्रस्तावाची शिफारस केंद्र सरकारकडे करणार आहे. तशी अधिसूचना राज्य सरकारकडून जारी करण्यात आली आहे. यानुसार, मुंबईसह पुणे, नागपूर येथील मेट्रो मार्गिकांच्या स्थानकांच्या नावात बदल करता येणार आहे.

मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर या शहरांत मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. त्यातील काही शहरांमध्ये मेट्रो मार्गिका सुरू झाल्या आहेत. मात्र मेट्रो मार्गिकांच्या स्थानकाच्या नावात बदल करण्याची मागणी वारंवार होत असते. स्थानिक प्रतिनिधी असो किवां रहिवाशी यांच्याकडून ही मागणी होत असते. मात्र प्रस्ताव पाठवल्यानंतर प्राधिकरणाकडून योग्य प्रक्रियेचे पालन केले जात नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्य सरकारने पावलं उचलत एक समिती गठित केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मेट्रो स्थानकांच्या नामकरण व नामांतरासाठी समिती गठीत केली आहे.  तसेच, स्थानकांची नावे बदलताना पाळावयाच्या अधिकृत कार्यपद्धतीबाबतही शासनाने यापूर्वीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

समितीमध्ये कोण असणार?

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित क्षेत्रातील लोकसभा सदस्य, संबंधित क्षेत्रातील विधानसभा सदस्य, संबंधित क्षेत्रातील महानगरपालिका/प्राधिकरण/विशेष नियोजन प्राधिकरण, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, संबंधित मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी संस्थेचे प्रशासकीय प्रमुख

जीआर मध्ये काय लिहिलंय?

मेट्रो रेल (स्थानकांचे नामकरण किंवा पुनर्नामकरण) नियम, 2026 मधील नियम 3 (1) अन्वये प्राप्त झालेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे मुंबई महानगर प्रदेश / पुणे महानगर प्रदेश / नागपूर महानगर प्रदेश येथील मेट्रो रेल स्थानकांच्या नामकरणासाठी आणि पुनर्नामकरणासाठी केंद्र शासनाकडे शिफारशी सादर करण्याकरिता खालील सदस्यांची "मेट्रो रेल्वे स्थानक नामकरण व पुनर्नामकरण समिती" गठित करण्यात येत आहे.

नियम काय?

1) साांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व.

2) समान किंवा एकाच प्रकारच्या नावांचा गोंधळ टाळणे.

3) स्थानिक जनता आणि भावनाांचा विचार.

4)  नाव उच्चारण्यास सोपे असणे व भौगोलिक स्थानाशी सुसांगत असणे (व्यावहारिक सुलभता).

5) कोणत्याही प्रकारचा वाद  टाळून प्रतीकात्मक प्रतिनिधित्व (नेते किंवा देवता) यांचा समतोल साधणे.

6) परिसराच्या ओळखीशी स्पष्टता व सुसंगतता राखणे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune Metro
Mumbai Metro
Devendra Fadnavis