SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महाराष्ट्र हादरला! नऊ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या, खाऊचे आमिष दाखवत टेकडीवर नेले अन्...

नवी मुंबईतील तुर्भे परिसरात घराजवळ खेळताना बेपत्ता झालेल्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 14, 2026, 06:53 AM IST | Updated: Oct 14, 2026, 06:54 AM IST
Image Credit: minor girl murder
Join

गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारातील घटना वाढत असतानाच महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. नवी मुंबईत नऊ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे 30 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी दुपारी चिमुकली घराबाहेर खेळत होती. घराबाहेर खेळत असताना ती अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी तिचा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र ती कुठेच सापडली नाही. तेव्हा मात्र तुर्भे पोलीस ठाण्याच तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन घेत मुलीचा शोध सुरू केला आहे.

अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली होती. घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा मुलीच्या परिचयातील आणि त्याच परिसरात राहणारा 30 वर्षीय व्यक्ती तिला खाऊचे आमिष दाखवून तिला रिक्षातून घेऊन गेला.

सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला माग काढत त्याला ताब्यात घेतले. तेव्हा चौकशीत त्याने मुलीला पावणे एमआयडीसी परिसरातील जंगलात मंदिराजवळ नेल्याचे सांगितले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन गळा दाबून हत्या केल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित परिसरात शोध घेतला असता मुलीचा मृतदेह आढळला.

दरम्यान, चिमुरडीच्या अपहरणानंचर अत्याचार आणि हत्या झाल्याचे समोर येताच संतप्त नागरिकांनी तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याबाहेर जमून आरोपीला समोर आणण्याची मागणी करत घेराव घातला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन त्यांनी दिल्यानंतर जमाव शांत झाला.

आदिवासी तरुणीवर अत्याचार

नाशिकच्या पंचवटीतील पवार चाळ परिसरात १९ वर्षीय आदिवासी तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले. आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.  विक्रमकुमार शाह आणि अशोक शाह अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. म्हसरूळ पोलिसांकडून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES