SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

रोज ₹5 कोटींचा तोटा! लाडक्या ST बसकडे बहिणींनी अचानक का फिरवली पाठ? दैनंदिन 5 कोटींच्या तोट्याशी महिलांचा काय संबंध?

एसटी महामंडळाला रोज पाच कोटी रुपयांचा तोटा होत असल्याची थक्क करणारी आकडेवारी समोर आली असून यासाठी महिला प्रवाशी कशा जबाबदार आहेत आणि नेमकं चाललंय काय जाणून घ्या सविस्तपणे अगदी आकडेवारीसहीत...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 24, 2026, 08:22 AM IST | Updated: Oct 24, 2026, 08:34 AM IST
Image Credit: या तोट्याचं महिलांशी काय कनेक्शन? (प्रातिनिधिक फोटो)
Join

महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात जाणाऱ्या आणि लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या एसटी बसला तोट्याचं ग्रहण लागलं आहे. विशेष म्हणजे सध्या दिसत असलेला हा आर्थिक फटका एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने बसत आहे. लाडक्या बहि‍णींनी महाराष्ट्राच्या लाडक्या लालपरीकडे पाठ का फिरवली आहे? नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊयात...

रोज पाच कोटींचा तोटा

राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत चालवल्या जाणाऱ्या एसटीच्या दैनंदिन उत्पन्नात ऑक्टोबरमध्ये तब्बल पाच कोटी रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. एसटीला सप्टेंबर महिन्यात रोज मिळणाऱ्या 33 कोटी रुपयांच्या उत्पन्नात पाच कोटींची घसरण होऊन ते ऑक्टोबरमध्ये 28 कोटींपर्यंत खाली आलं आहे. यासाठी महिला प्रवाशांची संख्या कमी झाल्याचं कारण दिलं जात आहे. आता याला महिला कशा जबाबदार त्यांनी या सेवेकडे पाठ का फिरवली याबद्दल बोलायचं झालं तर 1 ऑक्टोबरपासून महिला प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य करण्यात आलं आहे. या कार्डची नोंदणी आणि कार्ड वापरातील अडचणींमुळे महिला प्रवासी एसटीपासून दुरावत असल्याची चर्चा आहे. उत्पन्नातील घसरणीमागे कार्डची सक्ती हेच कारण असल्याचे स्पष्ट करणारी आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. मात्र महिला प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याचा दावा केला जातोय.

महिलांना नेमकी अडचण काय??

राज्यभरात एसटीने रोज साधारण 5 कोटी महिला प्रवासी प्रवास करतात. महिला सन्मान योजनेअंतर्गत एसटीच्या तिकिटाच्या दरात त्यांना 50 टक्के सवलत दिली जाते. मात्र, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्डची नोंदणी आणि अॅक्टिव्हेशन आवश्यक करण्यात आलं आहे. उपलब्ध माहितीनुसार, 88 लाख 81 हजार 567 महिलांचे कार्ड अॅक्टिव्ह झाली आहेत. महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. कार्ड नोंदणीतील अडचणी, ओव्हरचार्जिंग आणि प्रक्रियेबाबतच्या तक्रारींमुळे महिलांना सवलतीचा लाभ घेण्यात अडथळे येत असल्याचे सांगण्यात येते. एसटीच्या प्रवासी संख्येवर दुष्काळासह अन्य कारणांचाही परिणाम होत असताना एनसीएमसी कार्डच्या अंमलबजावणीमुळे निर्माण झालेल्या अडचणींचा आढावा घेण्याची मागणी होत आहे.

थक्क करणारे आकडे

सप्टेंबर 2026 मध्ये सवलत मूल्य धरून एकूण उत्पन्न 990 कोटी 49 लाख 73 हजार रुपये होतं असं एसटी महामंडळाच्या आकडेवारी दर्शवते. याच आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2025 मध्ये हे उत्पन्न 888 कोटी 52 लाख 72 हजार रुपये होते. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात 101 कोटी 91 लाख एक हजार रुपयांची वाढ झाली. मात्र, याच काळात महामंडळाचा तोटाही वाढल्याचं ही आकडेवारी दर्शवते. सप्टेंबर 2026 मध्ये तोटा 94 कोटी 46 लाख 71 हजार रुपये होता, तर सप्टेंबर 2025 मध्ये तो 58 कोटी 13 लाख 17 हजार रुपये होता. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर वर्षभरात तोट्यात ३६ कोटी ३३ लाख ५४ हजार रुपयांची वाढ झाली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES