रोहित पवार : ‘मफलर वाला नेता’ कोण?...महाराष्ट्राच्या राजकारणात या शब्दाने खळबळ उडवली आहे. अजित पवार यांच्या अपघात\घातपातामागे असलेल्या वाचवणारा नेता कोण? असा प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला. रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासावरून गंभीर आरोप केले आहेत. यावेळी रोहित पवार यांनी ‘मफलर वाला नेता’ कोण? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. रोहित पवार यांनी मफलर वाला नेता कोण आहे या नेत्याचे नाव रोहित पवार यांनी जाहीर केले आहे.
दादांच्या विमान अपघाताचे खापर हे कदाचित पायलटवर फोडतील
दादा गेल्यावर राज्य सरकारने व्हीएसआरला १६८ कोटी रूपये दिले गेलेत.
विमाने चांगली मिळावीत यासाठी टेंडर काढावे अशी दादांची इच्छा होती, पण ते केंद्रातील विमान वाहतूक मंत्रालायचून रद्द करून व्हीएसआरला कंपनीला ते टेंडर दिले गेले.
रोहित पवार
स्वतःच्या काकाला न्याय देवू शकत नसेल तर मग गरिबांना कसा न्याय देवू शकेन. यासाठी मला राजकीय किंमत मोजावी लागेल. माझे घरचे टेन्शनमध्ये आहेत. दादाला सोडले नाही तर तुला कसे सोडतील असं त्यांचे मत आहे
राजकारणात पदासाठी आलो नाही.
ज्या व्यक्तीचे नाव घेणार आहे, ती व्यक्ती दादांच्या घातपातामागे आहे असे मी म्हणत नाही. व्हीएसआर कंपनीला मात्र तो वाचवत आहे.
कर्नाटकात आम्ही झिरो एफआयआर केला. सीआयडीकडे पाठपुरावा केला. पण सीआयडीला कुलूप लावावे लागेल.
खरात प्रकरणाशी लिंक आहे का याचा तपास सीआयडीने केला नाही. खरात प्रकरणाचेही पुढे काय झाले हे समजत नाही. काळा जादूवर विश्वास असणाऱ्यांचा हेतू काय होता हे समजून घेणे गरजेचे आहे.
आरटीआय मधून आम्ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण माहिती दिली गेली नाही.
व्हीएसआर कंपनीचे देशाबाहेर संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे, काही गुन्हेही दाखल आहेत
अजितदादा गेल्यावर दोन दिवसांनी १८ कोटींचे घर व्हीएसआरने अमेरिकेतील फ्लोरिडात विकत घेतले. कोडॅक ब्लॅककडून हे विकत घेतले. कोडॅक ब्लॅक हा रॅपर असून ड्रग्जचा धंदा करत होता. बेकायदेशीर शस्त्र त्याच्याकडे होती. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी खूप आहे.
अलास्का UTHA अलायन्स कंपनीत रॅानेल लोईमा सोबत व्ही के सिंगच्या मुलांची सोबत पार्टनर आहे. हाही ड्रग्ज धंदा करतो.
रोहित सिंग, राहूल सिंग आणि व्ही के सिंग यांची प्रवृत्ती यातून दिसते
व्ही के सिंग व त्यांची मुलं ही सोन्याचीही मोठ्या प्रमाणात तस्करी करतायत. दोन हजार कोटी सोने विमानात घेवून जातात. यांची पोहोच मोठ्या लोकांपर्यंत आहे.
व्हीएसआरच्या २७ कंपन्या असून ८६८ कोटींचे कॅशचे व्यवहार झालेत. व्ही के सिंगला सरकारच वाचवत आहे.
विमान वाहतूक मंत्री नायडू यांचे व्हीएसआरशी संबंध आहेत.
भाजपचे मुंबईतील कार्यालय हे जयेश शहा यांची नमन कंपनी बांधत आहे. त्यांचेही व्हीएसआर कंपनीशी संबंध आहेत.
व्हीएसआरच्या पाठिशी मोठमोठे लोक आहेत.
दादा ज्या विमानात बसले होते, ते विमान पूर्णतः ४० कोटी कॅशमध्ये घेतले होते.
व्हीटी व्हीएसव्ही हे राज्यातील एका नेत्याचे आहे.