• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मफलरवाला नेता कोण? रोहित पवार यांनी 2 बड्या नेत्यांची नावे घेतली; पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा

मफलरवाला नेता कोण? रोहित पवार यांनी 2 बड्या नेत्यांची नावे घेतली; पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून आमदार रोहित पवारांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. अजित पवार यांच्या अपघात\घातपातामागे असलेल्या वाचवणारा नेता कोण? याबाबत रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. यावेळी रोहित पवार यांनी 2 नेत्यांची नावे घेतली.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 16, 2026, 16:46 IST|Updated: Nov 16, 2026, 17:05 IST
joinshare
मफलरवाला नेता कोण? रोहित पवार यांनी 2 बड्या नेत्यांची नावे घेतली; पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
मफलरवाला नेता कोण? रोहित पवार यांनी 2 बड्या नेत्यांची नावे घेतली; पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा

मफलरवाला नेता कोण? रोहित पवार यांनी 2 बड्या नेत्यांची नावे घेतली; पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा

2

'तुम्हाला या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, तुमच्यात प्रामाणिकपणा नाही,' वकिलाची थेट सरन्यायाधीशांसमोर टिप्पणी, पुढे घडलं असं काही...

3

आदित्य ठाकरेंसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांना गोडाऊनमध्ये बसवलं; मुंबई विद्यापीठातील संतापजनक प्रकार

4

'तर त्याला फासावर...', अजित पवारांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात CM फडणवीसांची मोठी मागणी; अमित शाहांसमोर म्हणाले, 'या अपघातामागे...'

5

मुलीच्या जन्मदिवशी लिटन दासने ठोकलं शतक, कॅमेऱ्यावर दाखवलं पानावर लिहिलेला खास संदेश

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

रोहित पवार : अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून आमदार रोहित पवारांनी पुन्हा गंभीर सवाल उपस्थित केलेत. व्हीएसआर कंपनी आणि कंपनीच्या मालकाचा ज्या पद्धतीने तपास व्हायला हवा होता तसा तपास झाला नसल्याचा दावा त्यांनी केला. हा अपघात नसून घातपात असावा असा संशयही त्यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्या अपघात\घातपातामागे असलेल्या वाचवणारा नेता कोण? असा प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी खळबळजवक दावा केला आहे. पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी 2 नेत्यांची नावे घेतली.

अजित दादांचा  अपघात का घातपात याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. विरोधात असूनही आम्ही दादांच्या विमान अपघाताचे खरं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे नाव मी घेतले. या दोघांनी त्यांनी फोन करुन थांबवले. ते कारने बारामतीला येणार होते. पण महत्वाची फाईल घ्यायचे असल्याचे सांगून त्यांना थांबवण्यात आले. दादांच्या दोन प्रमुख नेत्यांसाठी त्यांना मुंबईत थांबावे लागले. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांमुळे अजित पवारांचा कारऐवजी विमानानं प्रवास करावा लागला. दोन्ही नेते भेटीसाठी उशिरा आल्यानं अजित पवारांना विमानानं प्रवास करावा लागला असा मोठा दावा रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दावा.

अजित दादांच्या विमान अपघाताचा FRI दाखल का केला नाही?

अजित दादांच्या विमान अपघाताचा FRI दाखल करावा अशी मागणी होती. अद्याप FRI दाखल झालेला नाही. VRS कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे. ही मागणी देखील मान्य झालेली नाही.  अजित दादांचे 41 आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी CBI चौकशीची मागणी केली. 

अपघात की घातपात याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. काही नेते मॅनेज होवू शकतात, पण स्वाभिमानी जनता नाही. अनेकांचे ऋण माझ्यावर आहेत. यापूर्वीही मी अनेक मुद्दे समोर आणले आहेत. विमानाने का जावे लागले हे कारण मी सांगितले आहे. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे ते रस्ते मार्गे न जाता विमानाने जावे लागले. जास्त प्रमाणात इंधन टॅंकमध्ये टाकले गेले होते.

याप्रकरणी अद्याप एफआयआर झालेला नाही. व्हीएसआर कंपनी बंद करण्याची मागणी केली होती.  साडेनऊ महिने झाले आहेत, तरीही काही झालेले नाही. शंकेचे निरसन सत्ताधारी करत नाहीयत. राजकारण केवळ बघायला मिळत आहे.  सीआयडीवर कुणाचा दबाव आहे काय़ सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी अजित पवार यांच्या पक्षाने केली होती. तरीही अजून काहीही झालेले नाही असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.  

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Ajit Pawar
Rohit Pawar