BMC आणि KDMC कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! कुणाच्या खात्यात किती बोनस येणार?
मुंबई महापालिका आणि कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गोड होणार आहे. कारण कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई महापालिका आणि कल्याण - डोंबिवली महानगर पालिकेकडून कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी आहे. कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. मुंबई महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी खास करून गोड होणार आहे.
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना किती बोनस मिळणार?
कारण मुंबई महापालिकेच्या बोनसमध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 31 हजार बोनस देण्यात आले होते. तर यावेळी मुंबई महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 33 हजारांचा बोनस मिळणार आहे, अशी घोषणा महापौर रितू तावडे केली आहे.
कोणाला किती बोनस मिळणार?
मुंबई महापालिकेकडून 93 हजार 509 अधिकारी, कर्मचारी, सामाजिक आरोग्य स्वयंसेविका, बालवाडी शिक्षिका, मदतनीसला बोनस मिळणार आहे.
सामाजिक आरोग्य स्वयंसेविक - 14 हजार
बालवाडी शिक्षिका , मदतनीस - 7 हजार
आशा सेविकांना बोनसची निराशा
आशा सेविका व स्वच्छता मुंबई प्रबोधन मोहिमेतील सफाई कामगार 15 हजार बोनसबद्दल काही निर्णय घेण्यात आलेला नाही.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 21 हजारांचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवाळी बोनसमध्ये एक हजारांची वाढ करण्यात आली आहे. तर आशा सेविकांना 6000 बोनस मिळणार आहे. केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली चौधरी, स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येणार आहे, त्यामुळे त्यांची दिवाळी दणक्यात होणार आहे. तर 6000 कामगारांना हा दिवाळी बोनस मिळणार आहे.
कोणाला मिळणार बोनस?
- केडीएमसीमध्ये काम करणारे वर्ग 1 आणि 2 चे अधिकारी
- सर्व श्रेणीतील कामगार
- ठोक पगारी
- वाहन चालक
- केडीएमटीचे कामगार
- महापालिकेच्या शाळेतील शिक्षक
- विविध आरोग्य योजनेसाठी काम करणारे कामगार