• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! तीन विश्वासातल्या माणसांनी साथ सोडली, मलिंगा सहित....

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! तीन विश्वासातल्या माणसांनी साथ सोडली, मलिंगा सहित....

Mumbai Indians IPL 2027 : आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल झालेले आहेत. कोचिंग स्टाफमधील लसिथ मलिंगासह आणखीन दोघांनी आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सची साथ सोडली आहे.

Reported Bypooja pawar
Published: Oct 29, 2026, 03:12 PM IST|Updated: Oct 29, 2026, 03:50 PM IST
joinshare
मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! तीन विश्वासातल्या माणसांनी साथ सोडली, मलिंगा सहित....
Image Credit: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! तीन विश्वासातल्या माणसांनी साथ सोडली, मलिंगा सहित....

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'पूर्णेकर हत्या प्रकरणी त्यांनी...'

मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'पूर्णेकर हत्या प्रकरणी त्यांनी...'

2

हार्दिक पांड्याच्या ट्रेडसंदर्भात आर अश्विनचा मोठा दावा! CSK चे 'हे' तीन खेळाडू द्यावे लागणार?

3

50 लाख प्रवासी, 3 कंपन्या अन् 3 नोव्हेंबर 2026 ची डेडलाईन... नवी मुंबई एअरपोर्टसंदर्भात मोठी अपडेट

4

मोठी बातमी! शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरण भोवलं, पत्रात म्हणाल्या ‘माझ्यामुळे...’

5

दिवाळीच्या पहिला सण वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत, जाणून घ्या सणांची योग्य तिथी, शुभ मुहूर्त अन् पूजा विधी

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Mumbai Indians IPL 2027 : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी20 लीगपैकी एक आहे. या स्पर्धेचा पुढील वर्षी 20 वा सीजन पार पडणार असून या सीजनसाठी सध्या सर्व 10 फ्रेंचायझी आपल्या कोचिंग स्टाफची फळी तयार करण्यात व्यस्त आहेत. अनेक संघांच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल झाले असून यात मुंबई इंडियन्स या आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघाने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल केले आहेत. कोचिंग स्टाफमधील लसिथ मलिंगा, पारस म्हांब्रे आणि कार्ल हॉपकिन्सन या तिघांनी आगामी आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सची साथ सोडली आहे. हे तिघे मागील अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा भाग होते. यापूर्वी देखील मुंबई इंडियन्सचा माजी हेड कोच महेला जयवर्धनेने संघाची साथ सोडली होती. त्याच्या ऐवजी आयपीएल 2027 साठी आयपीएल बॅटिंग कोच कायरन पोलार्ड याला हेड कोच म्हणून नियुक्त करण्यात आले. 

मुंबई इंडियन्सने स्वतः केली पोस्ट :

गुरुवारी 29 ऑक्टोबर रोजी दुपारी मुंबई इंडियन्सने स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सदर बातमी देत पोस्ट केली. यात मुंबई इंडियन्सने आज जाहीर केले की, लसिथ मलिंगा, पारस म्हांम्ब्रे आणि कार्ल हॉपकिन्सन हे पुरुष संघाच्या कोचिंग सेटअपमधील आपापल्या पदावरून पायउतार होत आहेत. फ्रँचायझीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल, त्यांच्या निष्ठेबद्दल आणि त्यांनी बजावलेल्या सेवांबद्दल त्यांचे आभार मानले आहोत'.

अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्स सोबत करत होते काम :

आयपीएल 2027 पूर्व संघापासून बाजूला जाणारे लसिथ मलिंगा, पारस म्हांम्ब्रे आणि कार्ल हॉपकिन्सन हे तिघेही मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफचा एक अविभाज्य भाग होते. लसिथ मलिंगा हा मुंबई इंडिअन्सच्या  इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करण्यापासून ते 4 वेळा संघाला आयपीएल चॅम्पियन बनवण्यात मलिंगाचं मोठं योगदान होतं. मलिंगा हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू, कोच आणि  मार्गदर्शक म्हणून सुद्धा राहिला.

Setting up those yorker drills, cheering everyone on even when they missed, and always bringing that trademark smile.  Thank you for everything, Mali, your impact goes far beyond the bowling nets. https://t.co/uNmPDkRl8J

 Mumbai Indians (mipaltan) October 29, 2026

हेही वाचा : मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये 5 अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी केलं, पाहा 2027 साठी MI चा संपूर्ण संघ
 

पारस म्हांम्ब्रे याचा सुद्धा मुंबई इंडियन्ससोबत दीर्घ आणि मोलाची साथ राहिली.  प्रथम 2010 ते 2017 या काळात या संघाशी जोडलेले होते आणि त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा परतले. संघातील गोलंदाजीच्या प्रतिभेला विकसित आणि जोपासण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान, तसेच गेल्या अनेक वर्षांत त्यांनी निर्माण केलेले संबंध, या सर्वांचे खूप कौतूक आहे.  कार्ल हॉपकिन्सन 2025 च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. त्यांनी इंग्लंडच्या पुरुष संघासोबत काम केल्याचा मौल्यवान आंतरराष्ट्रीय अनुभव आणला होता. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai Indians
IPL
Cricket News
Marathi News
Sports News