• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /लाल ड्रेस, हाय हिल्स अन् विचित्र हावभाव; मोटरमनच्या केबिनला लटकून तरुणी उभी राहिली अन्; गोरेगाव स्थानकात हायव्होल्टेज ड्रामा

लाल ड्रेस, हाय हिल्स अन् विचित्र हावभाव; मोटरमनच्या केबिनला लटकून तरुणी उभी राहिली अन्; गोरेगाव स्थानकात हायव्होल्टेज ड्रामा

मुंबई लोकलमधील धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 19, 2026, 10:27 IST|Updated: Nov 19, 2026, 10:40 IST
joinshare
लाल ड्रेस, हाय हिल्स अन् विचित्र हावभाव; मोटरमनच्या केबिनला लटकून तरुणी उभी राहिली अन्; गोरेगाव स्थानकात हायव्होल्टेज ड्रामा
Image Credit: Mumbai Local Train Goregaon Railway station

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

2

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

3

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

4

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

5

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलमध्ये घडणाऱ्या घटनांमुळं चिंता व्यक्त केली जात आहे. गोरेगाव रेल्वे स्थानकातही असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोरेगाव रेल्वे स्थानकात महिलेकडून मोटरमनच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्थानकात एका तरुणीने गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कथितरीत्या मद्यधुंद अवस्थेत असलेली ही तरुणी मोटरमनच्या केबिनजवळ उभी असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. केबिनच्या दरवाजाचे हँडल दोन्ही हातांनी पकडून ती मागे झुकत विचित्र हालचाली करताना दिसते.

लोकलमधील प्रतिबंधित असलेल्या मोटरमनच्या केबिनमध्ये जबरदस्तीने प्रवेश करण्याचाही ती प्रयत्न करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, तरुणीचे नाव व ओळख अद्याप समोर आली नाहीये. मात्र अशाप्रकारे मोटरमनच्या मोटरमनच्या केबिनजवळ उभी असल्याने लोकल बराचकाळ थांबवण्यात आली होती. त्यामुळं काहीकाळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. एका तरुणीने लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचा घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

 

दरम्यान, या घटनेमुळे स्थानकावरील प्रवासी अवाक झाले असून रेल्वे आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तरुणीच्या नशेतील अवस्थेबाबत आणि रेल्वे पोलिसांच्या (RPF/GRP) पुढील कारवाईबाबत अधिकृत पुष्टी अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणात तिसराच प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली होती. दोन प्रवाशांमधील वादातून
फेकलेला चाकू लक्ष्य चुकल्याने अन्य एका प्रवाशाच्या छातीत घुसल्याची घटना रविवारी घडली. विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलमध्ये अंधेरी स्थानकातून गाडी सुटल्यानंतर हा प्रकार घडला. या या घटनेत सुरेश शर्मा (53) हे प्रवासी जखमी झाले. चाकू फेकल्याच्या आरोपावरून शिवा गायकवाड (25) याला वांद्रे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai Local
Mumbai News
Mumbai Metro