SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

प्रवाशांना मोठा दिलासा! कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू

कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. कसारा ते खर्डी 14 किमी लोकार्पण करण्यात येणार आहे. CRS गुरु प्रकाश यांच्या हस्ते उद्घाटन झाले असून प्रवाशांना मोठा दिलासा.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 18, 2026, 07:37 AM IST | Updated: Oct 18, 2026, 07:39 AM IST
Image Credit: kalyan kasara railway line
Join

कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील लाखो प्रवाशांसाठी ऐतिहासिक दिवस ठरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजेच कसारा ते खर्डी या 14 किलोमीटर मार्गिकेचे लोकार्पण मुख्य सुरक्षा आयुक्तांच्या हस्ते संपन्न झाले आहे. यामुळे कसारा घाटातील वाहतूक कोंडी आणि लोकलच्या बंचिंग समस्येवर मोठा तोडगा निघणार आहे. कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजेच कसारा ते खर्डी (14 कि.मी.) या मार्गिकेचे लोकार्पण मुख्य सुरक्षा आयुक्त गुरु प्रकाश यांच्या हस्ते विधिवत पूजा करून आणि तिसऱ्या मार्गिकेची जोडणी करून करण्यात आले.

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) हिरेश मीना, मुख्य अभियंता रिजवान अहमद, उप मुख्य अभियंता नजीम मुल्ला, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक बी. अरुण कुमार, वरिष्ठ अभियंता सचिन पांचाळ, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता आणि कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांच्यासह उपसरपंच मोकाशी आणि अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन 2011 च्या रेल्वे अर्थसंकल्पात कल्याण-कसारा आणि कल्याण-कर्जत तिसऱ्या मार्गिकेची घोषणा करण्यात आली होती. मात्र सदरचा प्रकल्प प्रत्यक्षात 24 जुलै 2016 रोजी मध्य रेल्वेचे तत्कालीन डिव्हिजनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव कमिटीचे सदस्य तथा कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांच्या हस्ते विधिवत पूजा करून सुरू झाला होता. तब्बल दहा वर्षांनंतर 17 ऑक्टोबर रोजी सदरचा मार्ग प्रत्यक्षात सुरू झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना या तिसऱ्या मार्गिकेसाठी सातत्याने पाठपुरावा करत होती आणि त्यांच्या पाठपुराव्याला पहिले यश आले आहे.

तिसऱ्या मार्गिकेचा दुसरा टप्पा खर्डी ते आसनगाव हा मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले आहे, तर पुढील तिसरा टप्पा आसनगाव ते कल्याण हा डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचा उद्देश रेल्वे प्रशासनाने ठेवला आहे. यामुळे कसारा घाटातील वाहतूक कोंडी आणि बंचिंगच्या समस्येवर मोठा तोडगा निघणार असून, लोकल सेवांना वेळेत धावण्यास मदत होणार आहे, ज्याचा थेट फायदा शहापूर, कसारा, आसनगावच्या हजारो प्रवाशांना होणार आहे. या ऐतिहासिक कामाबद्दल प्रवासी संघटनेतर्फे रेल्वे प्रशासनाचे आणि विशेषतः CRS गुरु प्रकाश व DRM हिरेश मीना तसेच मुख्य अभियंता रिजवान अहमद यांचे तसेच ग्रे इन्फ्रा कंपनीचे प्रमुख चंद्रेशभाई पटेल, आकाश पटेल, आणि प्रीतेश घनघाव यांनी चांगल्या पद्धतीने 14 किमी चे काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल आभार मानण्यात आले. उर्वरित खर्डी ते कल्याण हा टप्पा देखील लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी संघटनेतर्फे यावेळी करण्यात आली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES