SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मुंबई लोकलची क्षमता वाढणार; मध्य आणि पश्चिम रेल्वेवर होणार एक बदल, प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई लोकलचा प्रवास आता अधिक आरामदायी होणार आहे. कारण मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एक मोठा निर्णय घेण्यात येणार आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 26, 2026, 08:14 IST | Updated: Nov 26, 2026, 08:16 IST
Image Credit: Mumbai local train update
Join

मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुलभ आणि सूकर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आणखी 15  डब्यांच्या लोकल धावणार आहेत. त्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्म 5 आणि 6च्या विस्ताराचा वेग वाढला आहे. तसंच, यामुळं सिग्नल यंत्रणेवर परिणाम होऊन सध्याच्या फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करावा लागू शकतो. त्यामुळं मध्य रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक उपायांचा शोध घेतला जात आहे.

सीएसएमटीयेथे प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचा काम वेगाने सुरू आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर 17 डब्यांची लोकल उभी राहू शकते. तर, 5 आणि 6 क्रमांक प्लॅटफॉर्मचा विस्तार पू्र्ण झाल्यावर 14 डब्यांच्या लोकलसाठी जागा होऊ शकते. त्यामुळं या स्थानकातून 15 डब्यांच्या लोकल चालवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर 15 डब्यांच्या आणखी 18 लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन आहे. त्या कसारा मार्गावर चालविण्याची तयारी करण्यात आली होती. टिटवाळा स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम 17 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, दिवाळी आणि छठपूजेनिमित्त विशेष ट्रेनची सोडण्यात आल्याने आवश्यक ट्रॅफिक ब्लॉक मिळू शकले नाहीत. त्यामुळे कामाला विलंब झाला असून, कसारा मार्गावरील 18 फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन पुढे ढकलण्यात आले आहे.

रेल्वेच्या या नियोजनानुसार सध्या धावणाऱ्या 12 डब्यांच्या 18 लोकलच्या जागी 15 डब्यांच्या लोकल चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे फेऱ्यांची संख्या न वाढवता प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता सुमारे 25 टक्क्यांनी वाढणार आहे.

पश्चिम रेल्वेवर देखील 15 डब्यांच्या लोकल

वांद्रे स्थानकापर्यंत 15 डब्यांची लोकल सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यासाठी वांद्रे, खार रोड, सांताक्रूझ आणि विलेपार्ले या चार स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढवण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. या विस्तारानंतर प्रत्येक फेरीमागे अतिरिक्त 600 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता निर्माण होणार आहे. सध्या केवळ अंधेरीपर्यंत 15 डबा लोकल असल्याने प्रवाशांकडून या फेऱ्यांचा विस्तार करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.

स्थानकातील काम 75 टक्के झाले आहे. फलाट वाढवलेल्या ठिकाणी छताची कामे सध्या सुरू आहे. सांताक्रूझ आणि विलेपार्ले स्थानकांवरील कामे प्रत्येकी 40 टक्के पूर्ण झाली आहेत. अंधेरी ते वांद्रे विभागातील फलाटांची कामे पूर्ण झाल्यानंतर 15 डब्यांच्या लोकलचा विस्तार पुढे दादर आणि त्यानंतर मुंबई सेंट्रलपर्यंत करण्याचे पश्चिम रेल्वेचे नियोजन आहे. मात्र ही कामे टप्प्याटप्याने करण्यात येईल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES