टीसी अन् महिला प्रवाशांत वाद, तिकीट तपासताना प्रवाशाचे कपडे फाटले, कांदिवली स्थानकात तणाव, प्रवाशांनी अखेर...
कांदिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीवरून गोंधळ झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. महिला टीसी आणि महिला प्रवाशामध्ये तिकीट तपासणीवरून वाद झाल्याचे समोर आले आहे.
कांदिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीवरून गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. कांदिवली रेल्वे स्थानकात महिला टीसी आणि महिला प्रवाशामध्ये तिकीट तपासणीवरून वाद झाला आहे. इतकंच नव्हे तर या गोंधळात तिकीट तपासताना झालेल्या गोंधळात महिलेचे कपडे फाटल्याचेही समोर आले आहे.
काय घडलं नेमकं?
महिला टीसीने तिकिटाची मागणी करताच प्रवासी महिलेने पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिला टीसीने प्रवासी महिलेचा पाठलाग केला. मात्र पाठलागादरम्यान प्रवासी महिला तोल जाऊन फलाडावर पडली. तेव्हा तिचे कपडे काही प्रमाणात फाटल्याचे समोर आहे. शुक्रवारी संध्याकाळी कांदिवली रेल्वे स्थानकात ही घटना घडली. या घटनेनंतर स्थानकातील तिकीट तपासणी कार्यालयाबाहेर मोठा जमाव जमला होता.
घटनेनंतर स्थानकात मोठ्या संख्येने प्रवासी जमा झाले होते. तिकीट निरीक्षकाच्या वर्तनावर आक्षेप घेत जमावाने थेट महिला टिसीच्या माफीची मागणी केली. त्यामुळं काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफकडून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
तिकीट निरीक्षक नियमितपणे तिकीट तपासणी करत होत्या त्यावेळी हा प्रकार घडला. महिला टिसी नियमीत पणे तिकीट तपासनीस करत असताना हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती. तसंच, उपस्थित नागरिकांनी टीसीने उद्धट वर्तन केल्याचा आरोप करत कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाला शांत केले.
प्रकरण काय?
पश्चिम रेल्वेच्या मुख्य तिकीट निरीक्षक प्रिया अंबावडे या कांदिवली स्थानकावर नियमितपणे तिकीट तपासणी करत होत्या. त्यांनी विनातिकीट प्रवास करणाऱ्या 25 वर्षीय तरुणीला पकडले. दंडाची रक्कम भरावी लागेल या भीतीने त्या महिलेने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र टीसी अंबावडे यांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटीत महिला प्रवाशाचा तोल गेला अन ती फलाटावर पडली. तर महिला टीसीदेखील खाली पडल्या. यात गोंधळात महिला प्रवाशाचे कपडे काही प्रमाणात फाटले.
दरम्यान, या घटनेनंतर विनातिकीट प्रवाशांवर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार रेल्वे कर्मचाऱ्यांना असून, अशा प्रकारे सरकारी कामात अडथळा आणू नये असा इशारा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.