SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मुंबईकरांनो थंडीत शेकोटी पेटवताय? BMCने जारी केली महत्त्वाची सूचना, दंडाची किंमत तब्बल...

मुंबईच्या वातावरणात गारठा वाढण्यास सुरुवात झाली असून प्रदूषणही वाढण्यास सुरुवात झाली आहे. उघड्यावर शेकोटी पेटवल्यास 2 हजार दंड ठोठावण्यात येणार आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 22, 2026, 09:58 IST | Updated: Nov 22, 2026, 09:59 IST
Image Credit: Mumbai news today bmc fine of 2000 to lightning bonfire in the open to control pollution
Join

मुंबईच्या हवेत गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. पण त्याचबरोबर वायू प्रदूषणातही वाढ होताना दिसतेय. हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरत असताना मुंबई महापालिकेने कठोर पावलं उचलली आहेत. प्रदूषण करणाऱ्या अनेक घटकांवर महापालिकेने बंदी घातली आहे. त्यातीलच एक म्हणजे उघड्यावर शेकोटी पेटवल्यास 2 हजारांचा दंड ठोठावण्यात येईल.

मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल लागण्यास सुरुवात झाली आहे. हवेत गारवा वाढल्याने अनेकजण उब मिळावी म्हणून शेकोटी पेटवतात. घराबाहेरच्या मोकळ्या अंगणात किंवा मैदानात शेकोटी पेटवून बसलेले असतात. मात्र शेकोटीचा धूर आणि धुरके यामुळं प्रदूषणात आणखी वाढ होऊ शकते. म्हणूनच दंड 500 रुपयांवरुन दोन हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

शेकोटी पेटवल्यामुळे हवा प्रदूषण होते आणि त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी लाकूड, पालापाचोळा, कोळसा किंवा प्लास्टिक जाळून शेकोटी पेटवली जाते, ज्यामुळे हवेची गुणवत्ता खालावते.  

शेकोटीच्या धुरातून कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि सूक्ष्म धूलिकण  हवेत मिसळतात.  या धुरामुळे दमा (अस्थमा), खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि फुफ्फुसांचे विकार बळावतात. याचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसतो. हिवाळ्यात थंड हवेमुळे हा धूर जमिनीलगत साचून राहतो, ज्यामुळे धुरके तयार होते.

मुंबईत आज हवेचा गुणवत्ता निर्देशांक 170 इतका म्हणजे 'आरोग्यास हानिकारक' पातळीवर पोहोचला. 'एक्यूआय'मध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने पालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. हिवाळ्यात उघड्यावर कचरा जाळून वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी 500 रुपयांचा दंड 2 हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

हिवाळ्यात प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने 28 प्रकारची नियमावली बांधकामे, आस्थापने, कंपन्या आणि नागरिकांसाठी जारी केली आहे. ही नियमावली पाळली जाते का यावर नजर ठेवण्यासाठी शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात 74 स्क्वॉड तैनात करण्यात आली आहेत. या स्क्वॉडकडून प्रदूषणकारी प्रकल्पांना नोटीस बजावणे, काम बंद करणे, दंड आकारण्याची कारवाई करण्यात येत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES