SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मुंबई ते कोकण आता फक्त 1 तास 10 मिनिटांत, थेट विमानसेवा सुरू; किती असेल तिकीट दर अन् वेळापत्रक, वाचा A To Z माहिती

Mumbai To Sindhudurg Airplane Chipi Airport: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यातील थेट विमानसेवा आजपासून सुरू होत आहे. कसे असेल वेळापत्रक आणि तिकीट

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 16, 2026, 10:13 AM IST | Updated: Nov 16, 2026, 10:14 AM IST
Image Credit: Mumbai To Sindhudurg Airplane Chipi Airport
Join

डिसेंबर सुरू होताच अनेकांना वेध लागतात ते पर्यटनाचे. नाताळच्या सुट्ट्या व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर कोकणात किंवा गोव्याला धाव घेतात. कोकणात जायचं म्हणजे रस्तेमार्गाने किंवा ट्रेनने प्रवास करण्यात बराच वेळ जातो. मात्र आता तळकोकणात जाण्यासाठी प्रवास अधिक वेगवान आणि सुकर होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यातील  थेट विमानसेवा आजपासून सुरू होत आहे.

सिंधुदुर्गातील चीपी विमानतळावर गेल्या दोन वर्षापासून खंड पडलेल्या मुंबई सिंधुदुर्ग विमान सेवेला आजपासून सुरुवात होत आहे. या विमानसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सर्व तिकिटे विकली गेल्याचे ‘फ्लाय 91’च्या संकेतस्थळावर दिसत आहे.

चिपी विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हि विमानसेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असेल. त्यामुळे आता  एक तास 10  मिनिटात आता थेट सिंधुदुर्गला पोहोचता येणार आहे. या विमानसेवेचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे दोन्ही दिशांचा नियोजित प्रवास सुमारे 1 तास 10 मिनिटांचा आहे. सध्या या मार्गावर दररोज एक फेरी उपलब्ध असेल. त्यामुळे त्याच दिवशी. मुंबईतून सिंधुदुर्गला जाऊन संध्याकाळी विमानाने परत येण्याची सुविधा या वेळापत्रकात नाही.

विमान उड्डाणांच्या वेळा

नवी मुंबई ते सिंधुदुर्ग हे विमान सकाळी 7.55 वाजता उड्डाण घेईल, तर सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी चिपी येथे आगमन होईल.

सिंधुदुर्ग ते नवी मुंबई हे विमान सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी प्रस्थान करेल, तर सकाळी 10.30 च्या सुमारास नवी मुंबईत आगमन होईल

तिकीट दर:  सिंधुदुर्ग-मुंबई प्रवासासाठी अंदाजे 3500 रु. ते 7500 रु. दरम्यान आहेत (मागणी आणि तारखेनुसार तिकीटाचे दर बदलू शकतात ).

आसन क्षमताः विमानाची आसम क्षमता 72 इतकी आहे.

पर्यटनाला चालना मिळणार

या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रासह रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. आठवड्याचे सातही दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे. मुंबईशी थेट हवाई संपर्क निर्माण झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल. पर्यटन क्षेत्रातील विविध व्यवसायांना चालना मिळेल आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES