भारतीय रेल्वेचा आता विस्तार होत आहे. भारतातून आता थेट परदेशात ट्रेनने जाता येणार आहे. प्रभू श्रीराम हे भारताच्या संस्कृतीचा, आस्थेचा विषय आहे. तर आता सीतामाता कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आहे. प्रभूश्रीराम आणि सीतामातेचे जन्मस्थळ आता रेल्वेने जोडण्यात येणार आहेत.
भारतीय रेल्वेने भगवान श्रीराम यांचे जन्मस्थळ अयोध्या आणि माता सीता यांचे जन्मस्थळ असलेल्या नेपाळच्या जनकपूर येथे थेट रेल्वेने जाता येणार आहे. प्रशासनाने या रेल्वेला मंजूरी देण्यात आले आहेत. तर 21 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या ट्रेनमुळे रामायण सर्किट पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
रामायणात विशेष महत्त्व असलेल्या दोन पवित्र स्थळांमधील थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान अयोध्या आणि माता सीतेचे जन्मस्थान जनकपूर धाम आता एका नवीन साप्ताहिक रेल्वे सेवेद्वारे जोडले जातील.
भारतीय रेल्वेने नेपाळमधील जनकपूर धाम आणि उत्तर प्रदेशातील अयोध्या दरम्यान नवीन ट्रेन चालवण्यास मंजुरी दिली आहे. सुमारे 604 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग भारत आणि नेपाळमधील यात्रेकरूंना मोठी सोय उपलब्ध करून देईल.
नेपाळमधील जनकपूर हे माता सीतेचे जन्मस्थान मानले जाते, तर अयोध्या हे प्रभू रामाचे जन्मस्थान आहे. या नवीन रेल्वे मार्गामुळे या दोन पवित्र स्थळांमधील प्रवास यात्रेकरू, पर्यटक आणि इतर प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर होईल. ही रेल्वे जनकपूर धाम आणि अयोध्या कॅन्ट दरम्यान अंदाजे 604 किलोमीटरचे अंतर कापेल. हा रेल्वे मार्ग बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधून जाईल.
गोरखपूरला पोहोचण्यापूर्वी ही रेल्वे उत्तर प्रदेशातील अयोध्या, मानकापूर आणि बस्तीमार्गे प्रवास करेल. त्यानंतर ती बिहारमधून जाईल. बिहारमधील अनेक शहरांमधून प्रवास करून ती नेपाळमधील जनकपूर धामला पोहोचेल. आपल्या अंतिम स्थानकांव्यतिरिक्त, ही रेल्वे बिहारमधील जयनागर, मधुबनी, शिशो, सीतामढी, रक्सौल, नरकटियागंज आणि उत्तर प्रदेशातील गोरखपूर, बस्ती, मानकापूर आणि अयोध्या धाम येथेही थांबेल. ही साप्ताहिक रेल्वे सेवा दर शनिवारी जनकपूर धाम येथून सुटेल आणि परतीचा प्रवास दर सोमवारी अयोध्या कॅन्ट येथून सुरू होईल.
अयोध्या-जनकपूर ही गाडी दर शनिवारी जनकपूर धामहून आणि दर सोमवारी अयोध्या कॅन्टहून धावतील. अयोध्या धाम आणि नेपाळमधील जनकपूर धाम यांच्यातील अंतर अंदाजे 604 किलोमीटर आहे. या रेल्वे मार्गामुळे भारत आणि नेपाळ दरम्यानचा प्रवास सुलभ होईल.
ही ट्रेन अयोध्येहून सायंकाळी 5.00 वाजता सुटेल आणि मंगळवारी सकाळी 8.00 वाजता जनकपूरला पोहोचेल. मात्र, वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. वेळापत्रक आणि इतर तपशिलांबाबत चर्चा सुरू आहे. सुरुवातीला ही ट्रेन साप्ताहिक विशेष म्हणून चालवण्याची आणि नंतर नियमित सेवा बनवण्याची योजना आहे.