IND VS NZ ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे सीरिजमधील पाचवा सामना हा रविवारी 15 नोव्हेंबर रोजी खेळवला गेला. वनडे सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे फॅन्स कर्णधार श्रेयस अय्यरवर नाराज झाले असून त्याच्यावर टीका करत आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये श्रेयस अय्यर सामन्याच्या दरम्यान विराट कोहलीने गोलंदाजी संदर्भात दिलेल्या एका सल्ल्याकडे दुर्लक्ष करताना दिसतो. या घटनेनंतर क्रिकेट फॅन्समध्ये नाराजी असून सोशल मीडियावर ते श्रेयसच्या या वागणुकीवर टीका करत आहेत.
विराटकडे कर्णधार श्रेयसने केलं दुर्लक्ष :
सदर घटना सामन्यादरम्यान भारताची गोलंदाजी सुरु असताना ओव्हर्समध्ये झालेल्या ब्रेक दरम्यान पाहायला मिळाली. व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले की श्रेयस अय्यर मैदानावर विकेटकिपर फलंदाज ईशान किशन सोबत एका विषयावर चर्चा करत होता. याच दरम्यान विराट कोहली सुद्धा या दोन खेळाडूंकडे गेला आणि असं दिसत होतं की विराट सामन्यादरम्यान कर्णधार श्रेयस अय्यरला काहीतरी सल्ला देताना दिसत होता. विराट कोहलीचं बोलणं पूर्ण होण्यापूर्वीच श्रेयस अय्यर त्याच्याकडे दुर्लक्ष करून तेथून निघून गेला. त्यानंतर विराट कोहली काहीसा नाराज दिसला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर विराटचे फॅन्स श्रेयस अय्यरवर टीका करत आहेत.
काय म्हणाले फॅन्स?
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर विराटाचे फॅन्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या. काहीजण म्हणाले की श्रेयसला कर्णधारपदाचा अहंकार आलाय. तर काही म्हणाले की विराट हा एक अनुभवी खेळाडू आहे, सामना अटीतटीचा सुरु असताना त्याचा अनुभवपूर्ण सल्ला हा श्रेयस अय्यरने ऐकायला हवा होता. तर काही फॅन्सचं मत आहे की, केवळ काही सेकंदांचा हा छोटा व्हिडिओ खेळाडूंमधील संवादाचा पूर्ण संदर्भ किंवा परिस्थिती स्पष्ट करत नाही त्यामुळे, कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल.
टीम इंडियाने जिंकली सीरिज :
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे सीरिजच्या पाचव्या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पुन्हा एकदा पट्ट्यांसारखी कोसळली. भारतीय फलंदाज केवळ 209 धावा करून ऑल आउट झाले. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून न्यूझीलंड संघाला ऑलआउट केलं आणि 22 धावांनी सामना जिंकला. पाच सामन्यांच्या सीरिजमधील तीन सामने जिंकल्यामुळे भारताने 3-1 ने आघाडी घेऊन सामना जिंकला.