• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /सोशल मिडिया इन्फ्युएन्सरची हत्या करणाऱ्या आरोपीचं पुढचं टार्गेट होते अमिताभ बच्चन! शार्पशूटर मुंबईत लपून बसला होता, 'जलसा'वर गोळीबार करण्याचा प्लॅन, पण...

सोशल मिडिया इन्फ्युएन्सरची हत्या करणाऱ्या आरोपीचं पुढचं टार्गेट होते अमिताभ बच्चन! शार्पशूटर मुंबईत लपून बसला होता, 'जलसा'वर गोळीबार करण्याचा प्लॅन, पण...

अभिनेते अमिताभ बच्चन यांचं घर म्हणजेच जलसा बंगला बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मागील काही दिवसांमध्ये तीनदा मिळाल्या असून अमिताभ यांच्या बंगल्यावर हल्ल्याचा कट चरणाऱ्यां दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 16, 2026, 08:35 AM IST|Updated: Nov 16, 2026, 08:51 AM IST
joinshare
सोशल मिडिया इन्फ्युएन्सरची हत्या करणाऱ्या आरोपीचं पुढचं टार्गेट होते अमिताभ बच्चन! शार्पशूटर मुंबईत लपून बसला होता, 'जलसा'वर गोळीबार करण्याचा प्लॅन, पण...
Image Credit: अमिताभ यांच्या घरावर गोळीबार करण्याचा होता प्लॅन (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता भारतातून थेट परदेशात धावणार रेल्वे! भारतीयांसाठी गुड न्यूज; हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक स्थळाला देता येणार भेट

आता भारतातून थेट परदेशात धावणार रेल्वे! भारतीयांसाठी गुड न्यूज; हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक स्थळाला देता येणार भेट

2

सोशल मिडिया इन्फ्युएन्सरची हत्या करणाऱ्या आरोपीचं पुढचं टार्गेट होते अमिताभ बच्चन! शार्पशूटर मुंबईत लपून बसला होता, 'जलसा'वर गोळीबार करण्याचा प्लॅन, पण...

3

जुन्या तांब्याच्या तारा अन् एक चूक, अमेरिकेतील एअर शटडाउनचे कारण समोर, 50 अब्ज डॉलरचा खर्च येणार

4

विराट कोहलीचा सल्ला न ऐकून श्रेयसने स्वतः केली मनमानी, Video पाहून फॅन्स नाराज

5

पंढरपूर आंबे विहीर दुर्घटना! 50 फूट खोल विहिरीतून तब्बल 19 तासानंतर 3 मृतदेह बाहेर काढले, दोघांचा शोध सुरू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी कलाकारांना चाहत्यांसोबत सेल्फी न काढण्याच्या तसेच जास्त जवळीक न करण्याच्या सूचना केल्या आहेत. टायगरवरील हल्ल्यानंतरच्या तपासामध्ये आरोपींच्या हीट लिस्टवर अगदी सलमान खानपासून आमिर खानपर्यंत आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून ते आयुषमान खुरानापर्यंत अनेक सेलिब्रिटी असल्याची चर्चा रंगली. असं असतानाच आता अमिताभ यांच्या घराबाहेर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी दोन शार्पशूटर्सला अटक केली आहे. हे दोघेही पंजाबचे रहिवाशी आहेत. या दोघांची कसून चौकशी केली जात असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एकाला दिल्ली तर दुसऱ्याला मुंबईतून अटक

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबारानंतर बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अमिताभ बच्चन यांचा 'जलसा' बंगला बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या तीनदा आल्या आहेत. त्यामुळेच अमिताभ यांच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्यातच 'जलसा'च्या बाहेर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना शनिवारी अटक करण्यात आली. विकास ठाकूर आणि दीपक सिंह अशी त्यांची नावे असून ते पंजाबमधील जालंधर व तरनतारनचे राहणारे आहेत. हे दोघे परदेशातील एका टोळीसाठी काम करतात. 1984 च्या शीख दंगलीबाबत केलेल्या कथित वक्तव्याप्रकरणी अमिताभ यांना लक्ष्य करण्याचा त्यांचा प्लॅन होता, असे सांगितले जात आहे.

मुंबईत लपून बसलेला आरोपी

पोलीस उपायुक्त (विशेष कक्ष) नरा चैतन्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात वास्तव्यास असलेल्या गँगस्टरच्या सूचनेवरून विकास मुंबईहून दिल्लीला आला होता. एका व्यावसायिकाला लक्ष्य करून खंडणीसाठी गोळीबार करणे हा त्याचा उद्देश होता. दीपक नंतर त्याच्यासोबत अमिताभ यांच्या घरावरील हल्ल्याच्या कटामध्ये सामील होणार होता. मात्र, व्यावसायिकावरील कथित हल्ला होण्यापूर्वीच पोलिसांनी विकासला अटक केली. त्याला अटक केल्यानंतर, तपास पथकाने दीपकचा शोध घेत त्याला मुंबईतून ताब्यात घेतलं. 3 ऑक्टोबर रोजी अमृतसरमध्ये इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर 'मॅड संधू'ची हत्या झाल्यानंतर, दीपक मुंबईत लपून बसला होता. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीतून असे समोर आले की, दीपकला त्याच्या सूत्रधारांनी नियोजित वेळेपेक्षा जास्त काळ मुंबईतच थांबण्यास सांगितले होते. त्याला अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, असे समजते.

'मॅड संधू'ची हत्या घडवून आणली

अमृतसरमध्ये 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबारात इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर 'मॅड संधू'ची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दीपकवर आरोप असून, त्याच्यासोबत पलविंदर ऊर्फ 'काका' हा साथीदारही सामील होता. पलविंदरला पंजाब पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, विकासने गुन्हेगारी विश्वात प्रवेश करताना सुरुवातीला चोरी, चेनस्नॅचिंग आणि बेकायदेशीर सट्टेबाजीसारखे गुन्हे केले होते. त्यानंतर तो संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या संपर्कात आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये विकासने गँगस्टर अनमोल बिश्नोईला बेकायदेशीर शस्त्रे पुरवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने अनिल पंडित आणि रणदीप मलिक यांच्यासह इतर गँगस्टर्ससोबतही काम केले. त्याच्यावरील कथित जबाबदाऱ्यांमध्ये शस्त्रे उपलब्ध करून देणे, साथीदारांची भरती करणे आणि खंडणीच्या कारवायांसाठी रेकी करण्याचा समावेश होता. दुसरीकडे दरम्यान, दीपक यापूर्वी ट्रक हेल्पर आणि ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्यानंतर तो स्थानिक टोळीतील सदस्यांच्या माध्यमातून संघटित गुन्हेगारीत सामील झाला असावा, असे मानले जात आहे.

अमिताभ बच्चन आणि शीखविरोधी दंगल प्रकरण काय?

या नियोजित हल्ल्यामागचे 1984 च्या शीखविरोधी दंगलींबाबत अमिताभ बच्चन यांनी केलेली विधाने कारणीभूत सांगितले जात आहे. मात्र, आपण ही विधाने कधीच केली नव्हती असं अमिताभ यांनी यापूर्वीच सर्व आरोप फेटाळताना स्पष्ट केलं आहे. 1984 च्या शीखविरोधी दंगलींबाबत अमिताभ बच्चन यांनी हिंसाचार भडकावल्याचे आरोप करण्यात आले. काही शीख संघटना आणि साक्षीदारांनी असा आरोप केला की बच्चन यांनी दूरदर्शनच्या थेट प्रक्षेपणादरम्यान हात उंचावून "खून का बदला खून से लेंगे" (रक्ताचा बदला रक्ताने घेऊ) अशी घोषणा देऊन जमावाला भडकावल्याचा आरोप केलेला, असा उल्लेख 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तात आहे. 2011 मध्ये अमिताभ बच्चन यांनी शीख धर्माचे सर्वोच्च पीठ असलेल्या श्री अकाल तख्त साहिबचे जथेदार यांना एक पत्र लिहून आपली बाजू स्पष्ट केली होती. हिंसाचार भडकावल्याचे आणि शीखविरोधी घोषणा दिल्याचे सर्व आरोप निराधार आणि धादांत खोटे असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले होतं. 1984 च्या शीखविरोधी दंगली या धर्मनिरपेक्ष भारताच्या इतिहासातील एक काळा अध्याय आणि कलंक असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले होते. आपली आई तेजी बच्चन या स्वतः शीख कुटुंबातील होत्या. त्यामुळे शीख धर्म आणि परंपरेबद्दल आपल्या मनात नेहमीच नितांत आदर असल्याचे त्यांनी नमूद केले होते.

तरीही 'बिग बी' चाहत्यांना भेटले

'जलसा'वर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या दोघांना शनिवारी अटक केल्यानंतरही अमिताभ हे दुसऱ्याच दिवशी चाहत्यांना भेटायला आले. अमिताभ हे दर रविवारी जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांचे अभिवादन स्वीकारतात. मागील रविवारी ते बुलेट प्रूफ काचेच्या आडून चाहत्यांना दिसले होते. तिसऱ्यांदा आलेली बॉम्ब हल्ल्याची धमकी आणि दोन शार्पशूटर्सच्या अटकेमुळे ते रविवारी घराबाहेर जमलेल्या चाहत्यांना भेटायला येतील की नाही याबाबत शंका होती. मात्र भीती झुगारून अमिताभ यांनी घराबाहेर नेहमीच्या स्टाईलमध्ये चाहत्यांना अभिवादन केले.

Amitabh Bachchan greeted his fans today from inside a 12 foot bulletproof glass. https://t.co/EQLtRm1vk7

— News Algebra (@NewsAlgebraIND) November 1, 2026

विशेष म्हणजे अमिताभ यांच्या या भेटीदरम्यान त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक हा वडिलांच्या मागेच उभा असल्याचं दिसून आलं. वडिलांच्या काळीपोटी मागील आठवड्यापासून अभिषेकही अमिताभ यांच्यासोबत गेटवर उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Amitabh Bachchan
Mumbai News
crime