• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /सोमवार 16 नोव्हेंबर रोजी LPG गॅस सिलेंडरच्या किंमती किती? पाहा घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे रेट्स

सोमवार 16 नोव्हेंबर रोजी LPG गॅस सिलेंडरच्या किंमती किती? पाहा घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे रेट्स

LPG Gas Cylinder Rates Today : देशातील बहुतांश भागात अन्न शिजवण्यासाठी आजकाल LPG गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. तेव्हा तुमच्या शहरातील LPG गॅस सिलेंडरच्या किंमती जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Nov 16, 2026, 09:02 AM IST|Updated: Nov 16, 2026, 09:58 AM IST
joinshare
सोमवार 16 नोव्हेंबर रोजी LPG गॅस सिलेंडरच्या किंमती किती? पाहा घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे रेट्स
Image Credit: आजच्या LPG गॅस सिलेंडरच्या किंमती

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
मुंबई ते कोकण आता फक्त 1 तास 10 मिनिटांत, थेट विमानसेवा सुरू; किती असेल तिकीट दर अन् वेळापत्रक, वाचा A To Z माहिती

मुंबई ते कोकण आता फक्त 1 तास 10 मिनिटांत, थेट विमानसेवा सुरू; किती असेल तिकीट दर अन् वेळापत्रक, वाचा A To Z माहिती

2

महाराष्ट्राला हादरवणारा घटनाक्रम! 22 व्या वर्षी लग्न, 25 व्या वर्षी Extramarital Affair अन् पुण्याहून माहेरी आल्यानंतर घात; प्रियकराने घरात घुसून..., संध्याकाळी ऊसाच्या फडात...

3

आता भारतातून थेट परदेशात धावणार रेल्वे! भारतीयांसाठी गुड न्यूज; हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक स्थळाला देता येणार भेट

4

सोमवार 16 नोव्हेंबर रोजी LPG गॅस सिलेंडरच्या किंमती किती? पाहा घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे रेट्स

5

सोशल मिडिया इन्फ्युएन्सरची हत्या करणाऱ्या आरोपीचं पुढचं टार्गेट होते अमिताभ बच्चन! शार्पशूटर मुंबईत लपून बसला होता, 'जलसा'वर गोळीबार करण्याचा प्लॅन, पण...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

LPG Gas Cylinder Rates Today : सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या या दररोज सकाळी 6 वाजता LPG गॅस सिलेंडरचे ताजे दर जाहीर करत असतात. बहुतांशी महिन्याच्या सुरुवातीला LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होतात. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली होती. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती मात्र स्थिर आहेत. भारतात 14.2 किलोग्रामचे घरगुती सिलेंडर आणि 19 किलोग्राम वजनाचे व्यवसायिक सिलेंडर वापरले जातात. घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे जून 2026 पासून स्थिर आहेत. आज जाहीर करण्यात आलेल्या ताज्या रेट्सनुसार तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती जाणून घेऊयात.

तुमच्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती :

दिल्ली    939.50 रुपये    
नोएडा    939.50 रुपये    
मुंबई    941.50 रुपये    
कोलकाता    968.00 रुपये    
पटना    1,031.50 रुपये    
बेंगलुरु    944.50 रुपये    
जयपुर    945.50 रुपये    
तिरुवनंतपुरम    951.00 रुपये    
लखनऊ    979.50 रुपये    

हेही वाचा : आता भारतातून थेट परदेशात धावणार रेल्वे! भारतीयांसाठी गुड न्यूज; हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक स्थळाला देता येणार भेट

तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती :

दिल्ली    2,820.00 रुपये
नोएडा    2,757.50 रुपये
मुंबई          2,774.50 रुपये
कोलकाता    2,964.00 रुपये
पटना    3,110.50 रुपये
बेंगलुरु    2,774.00 रुपये
जयपुर    2,839.00 रुपये
तिरुवनंतपुरम    2,861.50 रुपये
लखनऊ    2,932.50 रुपये

LPG गॅस सिलेंडरची खरी किंमत किती?

सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइलने एक्सवर लिहिले की, 'घरगुती गॅस सिलेंडरची वास्तविक किंमत ही 1,267.24 रुपये आहे. सरकारकडून 325.24 रुपयांचे अंडर रिकव्हरी कव्हर दिल्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या सर्व सामान्य ग्राहकांना LPG गॅस सिलेंडर साधारण 942.00 रुपयांना मिळतोय. दरम्यान 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने' अंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना दुहेरी लाभ मिळतो. त्यांना 300 रुपयांचे अतिरिक्त अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात (थेट लाभ हस्तांतरण - DBT द्वारे) जमा केले जाते, ज्यामुळे त्यांच्यासाठी एका सिलिंडरची प्रभावी किंमत 642 रुपयांपर्यंत खाली येते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
LPG Gas Price
Marathi News
Mumbai News