SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

लोकल कुठे पोहोचली, स्टेशनवर कधी येणार?; मुंबईकरांना लोकलचे रिअल टाइम लोकेशन कळणार

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मुंबईकरांना आता लोकलचे थेट लोकेशन कळणार आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 14, 2026, 08:16 AM IST | Updated: Oct 14, 2026, 08:17 AM IST
Image Credit: mumbai local
Join

मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. लोकलच्या वेळेवर अर्ध्या मुंबईकरांचे वेळापत्रक ठरलेले असते. लोकलला काही मिनिटे जरी वेळ झाला तरी  नोकरदारांना कार्यालयात लेट मार्क लागतो. पण आता मुंबईकरांना लोकलचे लाइव्ह लोकेशन मिळणार आहे. त्यानुसार तुमची लोकल आता कुठे आहे व स्थानकात किती वाजता पोहोचणार हे कळणार आहे.

मुंबईकरांना लोकल नेमकी कुठे आहे, हे 'रिअल-टाइम'मध्ये समजावे, यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार रेल्वे माहिती प्रणाली केंद्र (क्रिस) आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक लोकलच्या रेकमध्ये जीपीएस उपकरण बसवून तिचे अचूक स्थान समजण्याची यंत्रणा उभारण्याचा पर्यायही बैठकीत मांडण्यात आला.

मुंबई लोकलच्या मध्य आणि पश्चिम अशा दोन्ही रेल्वे मार्गावर दिवसभरात 288 लोकल रेकच्या
माध्यमातून 3,245 फेऱ्या दिवसभरात चालविल्या जातात. रेलवन अॅपवर सध्या विविध रेल्वे सेवा उपलब्ध होत असल्या, तरी मुंबई लोकलच्या प्रत्यक्ष धावण्याची स्थिती उपलब्ध होत नाही. ती सुरू करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडील उपलब्ध माहितीचा वापर कसा करता येईल, यावर बैठकीत विचारविनिमय करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गाडी उशिराने धावत असल्यास किंवा अचानक रद्द होणे किंवा आपत्कालीन परिस्थितीत माहिती अचूक ठेवणे हे आव्हान असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यात्री अॅपवर लोकलचे लाइव्ह स्टेटस पाहण्याची सुविधा आहे. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेचा रेलवन अॅपमध्ये वापर करता येईल का, याची चाचपणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अपघातग्रस्तांना पश्चिम रेल्वेकडून कोट्यवधींची नुकसानभरपाई

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर विविध कारणांनी झालेल्या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेले प्रवासी, तसेच जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांना गेल्या तीन वषाँत पश्चिम रेल्वेकडून कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. लोकलमधून पडणे, तसेच अन्य रेल्वे अपघातांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही भरपाई देण्यात आली आहे.
आकडेवारीनुसार, 2023 -24 ते 2025-26 या तीन वर्षांत एकूण 1,553 प्रकरणांमध्ये 129 कोटी 14 लाख 86 हजार रुपये भरपाई देण्यात आली. यामध्ये 2024-25 मध्ये सर्वाधिक566 प्रकरणे
असून, या वर्षांत 48,34,98,000 रुपये भरपाई देण्यात आली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES