SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

राष्ट्रवादी पक्षात नेमकं चाललंय काय? 20 आमदारांची बैठक; सुनिल तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीची एक बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला 20 आमदार उपस्थित होते. सुनिल तटकरे यांनी या बैठकीत काय झालं याची माहिती दिली.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 03, 2026, 11:48 PM IST | Updated: Nov 03, 2026, 11:51 PM IST
Join

सुनिल तटकरे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद सुरु आहे. खासदार पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या पक्षातील दिग्गज नेत्यांनी थेट दिल्ली गाठून अमित शहा भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यानंतर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मुंबईत रात्री उशीरा राष्ट्रावादीची एक बैठक  पार पडली. 2 तास ही बैठक सुरु होती. 20 आमदार या बैठकीला हजर होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती सुनिल तटकरे यांनी दिली.    

या बैठकीत आमदाराना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्याची वरिष्ठ नेतृत्वाकडून सूचना करण्यात आली. आमदारांकडून बैठकीत बोलताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमधे सुरू असलेल्या संघर्षाबाबत विचारणा करण्यात आली.  सध्या वरिष्ठ नेत्यांमधे जे वाद सुरू आहेत त्याबाबत खाली आमच्या पर्यंत काहीच कळत नाही असा आमदारांचं म्हणणं आहे.  वरिष्ठ नेत्यांमधे सुरू असलेल्या संघर्षाच्या बाबी सातत्याने समोर येत असल्यामुळे पक्ष कमजोर होतं आहे.  आपला पक्ष सत्तेत असून देखील कामे होत नाहीत एकनाथ शिंदे यांच्याकडून कामे होतं नसल्याची आमदारां तक्रार केली.  पक्षातील एका माजी मंत्र्यांकडून बोलताना अर्थमंत्री पदाबाबत नेमकं काय झालं आहे याबाबत विचारणा करण्यात असे समजते. 

रोहित पवारांच्या आरोपांना सुनील तटकरेंचं उत्तर

पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांना पक्षात एकटं पाडलं जातंय, असं गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांनी हा आरोप केला. तसेच भाजपदेखील पार्थ आणि जय या दोन भावांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला. रोहित पवार यांच्या टीकेला सुनिल तटकरे यांनी उत्तर दिले.  रोहित पवारांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही.  टीव्हीवर दिसण्यासाठी रोहित पवार टीका करतात.  रोहित पवारांनी त्यांचा चेहरा पाहावा अशी टीका तटकरे यांनी केली. या बैठकीत कोणाच्याविरोधात भूमिका मांडली नाही. पक्षात कोणतेही मदतभेद नसल्याचे सुनील तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES