सुनिल तटकरे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद सुरु आहे. खासदार पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या पक्षातील दिग्गज नेत्यांनी थेट दिल्ली गाठून अमित शहा भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यानंतर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मुंबईत रात्री उशीरा राष्ट्रावादीची एक बैठक पार पडली. 2 तास ही बैठक सुरु होती. 20 आमदार या बैठकीला हजर होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती सुनिल तटकरे यांनी दिली.
या बैठकीत आमदाराना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्याची वरिष्ठ नेतृत्वाकडून सूचना करण्यात आली. आमदारांकडून बैठकीत बोलताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमधे सुरू असलेल्या संघर्षाबाबत विचारणा करण्यात आली. सध्या वरिष्ठ नेत्यांमधे जे वाद सुरू आहेत त्याबाबत खाली आमच्या पर्यंत काहीच कळत नाही असा आमदारांचं म्हणणं आहे. वरिष्ठ नेत्यांमधे सुरू असलेल्या संघर्षाच्या बाबी सातत्याने समोर येत असल्यामुळे पक्ष कमजोर होतं आहे. आपला पक्ष सत्तेत असून देखील कामे होत नाहीत एकनाथ शिंदे यांच्याकडून कामे होतं नसल्याची आमदारां तक्रार केली. पक्षातील एका माजी मंत्र्यांकडून बोलताना अर्थमंत्री पदाबाबत नेमकं काय झालं आहे याबाबत विचारणा करण्यात असे समजते.
पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांना पक्षात एकटं पाडलं जातंय, असं गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांनी हा आरोप केला. तसेच भाजपदेखील पार्थ आणि जय या दोन भावांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला. रोहित पवार यांच्या टीकेला सुनिल तटकरे यांनी उत्तर दिले. रोहित पवारांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही. टीव्हीवर दिसण्यासाठी रोहित पवार टीका करतात. रोहित पवारांनी त्यांचा चेहरा पाहावा अशी टीका तटकरे यांनी केली. या बैठकीत कोणाच्याविरोधात भूमिका मांडली नाही. पक्षात कोणतेही मदतभेद नसल्याचे सुनील तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.