Civil Judge Became Jain Monk: न्यायाधीश पदाची कठोर परीक्षा उत्तीर्ण झाली. आई बाबांचे स्वप्न पूर्ण केले मात्र, न्यायाधीश पदाच्या नोकरीचा त्याग करून करुन वैराग्याचा मार्ग स्विकारला. मध्य प्रदेशातील बेतुलच्या रहिवासी असलेल्या प्रखराश्री दीदी जैन सन्यासी बनण्याचा निर्णय घेतला आहे.
एलएलबी पूर्ण केल्यानंतर, 2023 मध्ये त्यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड झाली. त्याच्या आयुष्यातील यशाचा सर्वात मोठा क्षम होता. न्यायालयात पदभार स्वीकारण्यापूर्वी, त्यांनी जैन दीक्षा घेऊन आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संन्यासापूर्वी भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.
प्रखराश्री यांचे सुरुवातीचे शिक्षण मध्य प्रदेशातील बेतुल येथे झाले. भोपाळमध्ये त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्या न्यायाधीश व्हाव्यात अशी त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती.
प्रखरश्री जैन उच्चशिक्षित आहेत. त्यांनी भोपाळमधील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षण घेतले. बारावी पूर्ण केल्यानंतर, प्रखराश्रीने कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (CLAT) उत्तीर्ण केली.त्यानंतर अहमदाबादमधून एलएलबी पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये उच्च शिक्षण घेतले. 2023 मध्ये प्रखरश्री जैन यांची दिवाणी न्यायाधीश पदासाठी निवड झाली होती, परंतु त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
2023 मध्ये, त्यांची दिवाणी न्यायाधीश पदासाठी निवड झाली. त्यांनी आपल्या आई-वडिलांचे न्यायाधीश बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. मात्र, पदावर रुजू होण्यापूर्वी त्यांनी न्यायिक सेवेत जाण्याऐवजी जैन दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना लहानपणापासूनच आध्यात्मिक जीवनात रस आहे. न्यायाधीश किंवा वकील म्हणून काम करण्यापेक्षा भगवान महावीरांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करणे समाजासाठी अधिक फायदेशीर ठरेल, असा त्यांचा विश्वास आहे.
प्रखरश्री यांनी जैन दीक्षेची शपथ घेऊन तिने मोक्षाचा मार्ग निवडला आहे. त्यांचे वडील एलआयसीचे निवृत्त अधिकारी आहेत. प्रखरश्री यांच्यासोबत इतर चार भगिनींनीही ऐहिक इच्छांचा त्याग करून भक्तीचा मार्ग स्वीकारला आहे. रविवारी बेतुलमध्ये या पाच भगिनींसाठी बिनाउली यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.