• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /सोनं तब्बल 43,000 रुपयांनी स्वस्त! दिवाळीच्या तोंडावर गोल्ड मार्केट क्रॅश, पहिल्यांदाच असं घडलंय

सोनं तब्बल 43,000 रुपयांनी स्वस्त! दिवाळीच्या तोंडावर गोल्ड मार्केट क्रॅश, पहिल्यांदाच असं घडलंय

दिवाळीच्या तोंडावर गोल्ड मार्केट क्रॅश झाले आहे. भारतात सोनं तब्बल 43,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 03, 2026, 10:38 PM IST|Updated: Nov 03, 2026, 10:45 PM IST
joinshare
सोनं तब्बल 43,000 रुपयांनी स्वस्त! दिवाळीच्या तोंडावर गोल्ड मार्केट क्रॅश, पहिल्यांदाच असं घडलंय

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
न्यायाधीश पदाची कठोर परीक्षा उत्तीर्ण झाली; नोकरीचा त्याग करून बनली जैन संन्यासी

न्यायाधीश पदाची कठोर परीक्षा उत्तीर्ण झाली; नोकरीचा त्याग करून बनली जैन संन्यासी

2

राष्ट्रवादी पक्षात नेमकं चाललंय काय? 20 आमदारांची बैठक; सुनिल तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया

3

सोनं तब्बल 43,000 रुपयांनी स्वस्त! दिवाळीच्या तोंडावर गोल्ड मार्केट क्रॅश, पहिल्यांदाच असं घडलंय

4

रणजी ट्रॉफीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, एका रात्रीत बदलला संपूर्ण संघ; नेमकं काय घडलं?

5

टी20 नंतर वनडेतही टीम इंडिया न्यूझीलंडला देणार दणका? कशी असणार भारताची प्लेईंग 11?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Gold Market Crash : मागील महिन्याभरापासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. अशातच दिवाळीच्या तोंडावर गोल्ड मार्केट क्रॅश झाले आहे. सोनं 2026 मधील उच्चांकी दरापासून तब्बल 43,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने गुंकवणूकदार धास्तावले आहेत. तर, सर्वसामन्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया 3 नोव्हेंबरला दिवसाच्या शेवटी सोन्याचा दर किती रुपयांवर स्थिरावला. 

ऑक्टोबर 2026 या एका महिन्यात सोन्याच्या दरात 7 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.  2 नोव्हेंबर रोजी मुंबई स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1.37 लाख रुपयांपर्यंत घसरला. एका महिन्यापूर्वी सोन्याचा दर 1.48 लाखावर होता.  29 जानेवारी 2026 सोन्याचे 2026 मधील सर्वात उच्चांकी दर गाठला होता. सोन्याचा दर 1.80 लाखाच्या वर गेला होता. यामुळे सराफा बाजारात खळबळ माजली होती. अशातच आत्ताच्या दराशी तुलना करता सोनं तब्बल 43,00 रुपयांची स्वस्त झाले आहे. 

दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा

सोन्याचा दर 1,980 पर्यंत घसरला आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये सोन्याचा दर 1.38 लाखांपर्यंत खाली आला आहे. 
दिवाळीच्या आधी सोनं स्वस्त झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्वेसर्सच्या  दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे.  लोक लग्नसराईसाठी आगाऊ ऑर्डरही देत ​​आहेत. सोन्याच्या दरात घट झाली असूनही, गेल्या आठवड्यात खरेदी वाढली आहे. 

सोन्याचा दर का घसरत आहेत?

जागतिक घडामोडींचा परिणाम सराफा बाजारावर होत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील ताव वाढत आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. या सर्व घडामोडींमुळे सोन्याच्या दरावर दबाव येत आहे. दुसरीकडे चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी, जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवू शकतात. व्याजदरवाढीची शक्यता सोन्यासाठी नकारात्मक मानली जाते.  ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत 6.8 टक्क्यांनी घसरण झाली.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Gold Price