SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मुंबई-पुणे मार्गावर कनेक्टिंग लिंकवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी नवा नियम लागू; 'या' प्रकारच्या वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकवर केवळ बिगर-व्यावसायिक हलकी मोटार वाहने आणि प्रवासी बसेसनाच प्रवेश मिळणार आहे. पिकअप व्हॅन, टाटा एससह मालवाहू आणि धोकादायक पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना बंदी असेल.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 27, 2026, 03:39 PM IST | Updated: Oct 27, 2026, 03:45 PM IST
Join

Mumbai Pune Expressway New Rule: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कनेक्टिंग लिंकवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कनेक्टिंग लिंकवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे. यामुळे कनेक्टिंग लिंकवरुन प्रवास करणाऱ्या नियमीत वाहनचालकांना मोठा धक्का बसणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकवर मालवाहतूक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकवर 1 नोव्हेंबरपासून सर्व प्रकारच्या मालवाहतूक वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. आतापर्यंत हलक्या वाहनांच्या श्रेणीत येणाऱ्या पिकअप व्हॅनना या मार्गावरून जाण्याची परवानगी होती. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता त्यांनाही प्रवेश नाकारण्यात येणार आहे. याबाबत राज्याच्या अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने अधिसूचना जारी केली आहे.
राज्याच्या अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार मालवाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना नियमित द्रुतगती मार्गाचा वापर करावा लागणार आहे.. वाहतूक विभागाने मिसिंग लिंकवरील वाहतुकीसंदर्भात नवे नियम जाहीर केले आहेत.

महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी या मार्गावर मालवाहू वाहनांच्या वाहतुकीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. बोगद्याची रचना आणि तांत्रिक बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे लहान व्यावसायिक वाहने, पिकअप व्हॅन आणि टाटा एस सारख्या वाहनांना देखील या मार्गावर प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, खाजगी कार आणि प्रवासी बसेसना या मार्गावर धावण्यास परवानगी असणार आहे.  याव्यतिरिक्त, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके किंवा इतर धोकादायक पदार्थ वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांना या मार्गावरुन जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या जुन्या मार्गाचा वापर करावा लागेल.

वेगमर्यादा निश्चित 

कनेक्टिंग लिंकवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी वाहनांसाठी कमाल वेगमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. खाजगी कार आणि इतर हलक्या मोटार वाहनांना ताशी कमाल 100 किलोमीटर वेगाने प्रवास करण्याची परवानगी असेल. तर, प्रवासी बस आणि इतर प्रवासी वाहनांना ताशी कमाल 80 किलोमीटर स्पीडने वाहने चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कनेक्टिंग लिंकवरील बोगद्याची रचना आणि तांत्रिक वैशिष्ट्यांमुळे हे निर्बंध लादण्यात आले आहेत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. 1नोव्हेंबर 2026 पासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक प्रवाशांसाठी खुला झाला.  कनेक्टिंग लिंकची लांबी 13.3 किलोमीटर एवढी आहे. या लिंकमुळे मुंबई-पुणे अंतर 6 किमीने कमी झाले आहे. प्रवास वेळेत 25 मिनिटांची बचत झाली आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES