SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मेट्रो, मोनोनंतर वाहतुकीचा आणखी एक पर्याय, 22 स्थानके अन् बीकेसीची वाहतूक कोंडी फुटणार, कसा असेल नवा प्रकल्प

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुल पॉड टॅक्सी प्रकल्पाची मार्गिका सुमारे 8.85 किमी लांबीची असून, यामध्ये एकूण 22 स्थानके प्रस्तावित आहेत.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 28, 2026, 15:24 IST | Updated: Nov 28, 2026, 15:25 IST
Image Credit: Phase 1 of BKC pod taxi project to be completed soon Work on 263 piles for the bridge completed
Join

मुंबई लोकल, मेट्रो आणि मोनोनंतर मुंबईत आणखी एक सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा पर्याय तयार होतोय. कुर्ला-बीकेसी-वांद्रे भागातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पॉड टॅक्सी प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. या प्रकल्पातील पुलाच्या कामासाठी 263 पाईलचे काम पूर्ण झाले असून एकूण 44 टक्के काम पूर्ण करण्यात येत आहे. प्रकल्पाच्या पाइल कॅप आणि पियर उभारणीच्या कामाने गती पकडली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) 36 पाइल कॅपची, तर 25 पियरची उभारणी केली आहे. या प्रकल्पाचे एप्रिलमध्ये भूमिपूजन झाल्यानंतर एमएमआरडीएने कामांना गती दिली आहे. 8 महिन्यांत प्रकल्पाच्या कामांनी गती पकडली असून वाहतुकीला कमीत कमी अडथळा करून कामे करण्यावर एमएमआरडीएचा भर आहे. एमएमआरडीएकडून पॉड टॅक्सी प्रकल्पाची सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात या प्रकल्पात वांद्रे रेल्वे स्थानक ते बीकेसीतील उत्पादन शुल्क विभाग कार्यालय असा मार्ग उभारला जात आहे. तर कुर्ला रेल्वे स्थानक ते भारत डायमंड बोर्स असा भाग 2 हा मार्ग दुसऱ्या टप्प्यात उभारला जाणार असून या मार्गावर पॉडटॅक्सी धावण्याची 2031 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

प्रकल्प कसा असेल?

- पॉड टॅक्सीची स्थानके एकमेकांपासून सुमारे 200 मीटर अंतरावर असतील.
- एआय आधारित, चालकविरहित ऑपरेटिंग तंत्रज्ञान.
- प्रत्येक पॉडमध्ये 6 प्रवासी असतील.
- प्रत्येक पॉड 3.9 मीटर लांब, 2.07 मीटर रुंद आणि 1.8  मीटर उंच आणि वातानुकूलित असतील.
- 2031 पर्यंत दररोज 1.09 लाख प्रवासी प्रवास करू शकतील.

कसे असतील स्थानके?

कलानगर जंक्शन, उत्पादन शुल्क विभाग (मेट्रो २ब आणि मेट्रो 3 जवळ), बीडीबी गेट 11, सेबी (SEBI), एनएसई (NSE), नाबार्ड (NABARD), एमसीए (MCA) आणि जिओ वर्ल्ड सेंटर परिसरातील महत्त्वाचे थांबे आहेत. तर, संपूर्ण प्रकल्पातील सर्व 22 स्थानकांची अंतिम नावे आणि सविस्तर आराखडा अद्याप समोर आला नाहीये. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES