SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'दाढीवाला अजगर ही कडी जुळेल तेव्हा...', प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात सदावर्तेंचं सूचक विधान

प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येला एका महिन्याहून अधिक काळ उलटल्यानंतरही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. यावरुनच ठाण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 31, 2026, 09:18 AM IST | Updated: Oct 31, 2026, 09:35 AM IST
Image Credit: सदावर्तेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल (फोटो सोशल मीडियावरुन साभार)
Join

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील मानपाड्यामधील पदाधिकारी प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येच्या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलेलं असतानाच वकील गुणरत्न सदावर्तेंनी कठोर शब्दांमध्ये या साऱ्या गोंधळवर टीका केली आहे. "हे राजकारण निंदनीय आहे. तुम्ही गोळीच्या गोष्टी करता आम्ही त्याला उत्तर पेनाने देऊ. एखाद्या व्यक्तीला किती सपोर्ट करावा? प्रताप सरनाईक एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देता येत नाही. जे साधं बोनस देऊ शकत नाही त्याला वर तोंड करून म्हणतात ते आम्ही करावाई सहन करणार नाही. सरनाईक आणि शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा वापर केला. पूर्णेकरांच्या खूनात प्रश्न विचारायचा नाही. दडलेल्या राजकारणात मोजलं जात नाही. सहभाग समोर येताच त्यांची पुढची कडी कोणाची आहे हे समोर येईल. आज आपल्या समक्ष येण्यामागचं कारण राजकारणी म्हणून समाज हितासाठी काम करणारा माणूस म्हणून अत्यंत गंभीर मुद्दा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील लोक संकुचित राजकारण करत चालले आहेत," अशी टीका गुणरत्न सदावर्तेंनी केली.

प्रति रॅली कधीच काढली नव्हती

"राजकारणामध्ये माणसात फूट पडेल अशा प्रकारचं वर्तन राजकारण्यांकडून अपेक्षित नाही. शिंदे टोळीची ही माजलेली भाषा कोणी सहन करणार नाही. शिंदे साहेब या संस्कृतीमध्ये एखादी व्यक्ती जाते तेव्हा नाटकी पद्धतीने रडणं येत असतं," असा टोला सरावर्तेंनी लगावला. "पूर्णेकरांसंदर्भात जी काही माणसं रस्त्यावर येतात ती आपल्या भावना आपल्या नातेवाईकांना न्याय मिळावा अशी असते. अशा गोष्टींविरोधात सत्ताधाऱ्यांनी प्रति रॅली कधीच काढली नव्हती. काय चाललं आहे?" असा सवाल सदावर्तेंनी शिंदेंच्या शिवसेनेला केला आहे.  

तो मी नव्हेच हे तुमचं चालणार नाही

"तुम्ही भेट देऊ शकतं नाही? भेटायला आले तर भेटत नाहीत. एकनाथ शिंदे हे पालकमंत्री नाहीत, हे पूर्णेकरांच्या पत्नीने जे वक्तव्य केलं ते बरोबर आहे. शिंदे तुम्ही पत्रकारांशी बोलताना काय बोललात? महाराष्ट्रावर प्रश्न विचारणार. दुःखाची भावना टर उडवण्याचा प्रयत्न केला तर त्यावर बोलणार. मीनाक्षी शिंदेंनी असं काल प्रतिक्रिया देताना बोललात. पोलिसांना सांगत आहात का माजी महापौर या तुमच्या भगिनी आहेत. तुम्ही प्रभाव पाडत आहात का? संकुचित राजकारणाचा पायंडा पाडला आहे.  ज्याप्रमाणे शोकसभेच्या माध्यमातून लोक रॅली काढत असतील तर त्याला पॉलिटिकल ड्युटी समजू नका. तुम्ही पालकमंत्री आहात का? तुम्ही विचारलं का लोकांना का कॉम्बिंग करत आहेत? राम पूर्णेकर यांना रिक्षात डांबण्यात आलं हे चुकीचं आहे. गेंड्याची कातडी आहे त्यांची! तुमचा काळ संपल्यावर देखील तुम्ही राजीनामा देणार नाही. दोन युवकांना डिटेन केलं. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार दिसत आहेत. एकनाथ शिंदे तुम्ही बहीण म्हणून सांगत आहात असा अर्थ काढला जाईल. मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिला का तर पक्षाची बदनामी. तुम्ही राजीनामा घेतला नाही हे सांगत आहात. तो मी नव्हेच हे तुमचं चालणार नाही," असं सदावर्ते म्हणाले.  

दाढीवाला अजगर ही कडी जेव्हा...

"एकनाथ शिंदे तुम्हाला कोणी ना कोणी सांगणार पाहिजे. आमच्या हातात कायद्याने दिलेल्या पेनमध्ये जोर आहे. तुम्हारे गोळी का जबाब हम पेन से देंगे. प्रताप सरनाईकला काय बाबा! एसटी महामंडळाकडून बोनस देणं जमेना. अंडा भुर्जीवाल्यांना यांना दिवाळीच महत्व समजायला नको का? अशी लोक साधा बोनस देऊ शकत नाहीत. तो बोलतो शिवसैनिक म्हणून आम्ही ते बिलकुल सहन करणार नाही. एकनाथ शिंदे आणि सरनाईकांना एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देणं होत नाही. पूर्णेकर केसमध्ये दडलेल्या राजकारणात कोणी ही असो मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची कडी जोडली जाईल तेव्हा कळेल," असं सदावर्तेंनी म्हटलं आहे. "दाढीवाला अजगर ही कडी जुळेल तेव्हा डायपर लावावं लागेल," असं सूचक विधानही सदावर्तेंनी केलं.  

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES