• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /दिर्घकाळ पत्नी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देत असेल तर...; हायकोर्टाचा पतीला दिलासा, पत्नीला दिला मोठा धक्का

दिर्घकाळ पत्नी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देत असेल तर...; हायकोर्टाचा पतीला दिलासा, पत्नीला दिला मोठा धक्का

या प्रकरणामधील पती आणि पत्नीचं 2018 मध्ये लग्न झालं होतं. त्यानंतर घडलेला सारा प्रकार सुनावणीदरम्यान या दांपत्याने न्यायालयासमोर मांडला असून त्यानंतर न्यायालयाने निरिक्षण नोंदवताना काय म्हटलंय जाणून घेऊयात...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 31, 2026, 11:25 AM IST|Updated: Oct 31, 2026, 11:33 AM IST
joinshare
दिर्घकाळ पत्नी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देत असेल तर...; हायकोर्टाचा पतीला दिलासा, पत्नीला दिला मोठा धक्का
Image Credit: मंजूर झालेला घटस्फोट कायम (प्रातिनिधिक फोटो सौजन्य एआयवरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'त्यांच्या पार्श्वभागांमध्ये अ‍ॅसिड, लाल मिरची पावडर टाकली', राऊताचा गंभीर आरोप; थेट गृहमंत्री, पालकमंत्र्यांना सवाल! 'एका बाईसाठी आणि तिच्या...'

'त्यांच्या पार्श्वभागांमध्ये अ‍ॅसिड, लाल मिरची पावडर टाकली', राऊताचा गंभीर आरोप; थेट गृहमंत्री, पालकमंत्र्यांना सवाल! 'एका बाईसाठी आणि तिच्या...'

2

आकिब नबीची टीम इंडियात निवड! 2 ऐवजी आता 5 वनडे खेळणार, पाहा भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजसाठी भारतीय संघ

3

राजीनामा दिल्यानंतर मीनाक्षी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, 'माझ्यावर जे आरोप...'

4

दिर्घकाळ पत्नी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देत असेल तर...; हायकोर्टाचा पतीला दिलासा, पत्नीला दिला मोठा धक्का

5

31 ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती किती? पाहा आजचे ताजे इंधन दर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

राजस्थान उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला. एका घटस्फोट प्रकरणामध्ये न्यायालयाने पुरुषाला दिलासा दिलाय. नुकताच एका पुरुषाला मिळालेला घटस्फोट कायम ठेवला आहे. कोणतीही शारीरिक अक्षमता किंवा इतर वैध कारण नसताना, पत्नीने दीर्घकाळपर्यंत शारीरिक संबंध ठेवण्यास एकतर्फी नकार देण्याचा प्रकार हा 'मानसिक क्रूरते'च्या व्याख्येत बसतं, असं निरीक्षण न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की आहे.

पत्नीने घेतली न्यायालयात धाव

या प्रकरणामध्ये पतीविरोधात पत्नीने दोन अपिलं दाखल केली होती जी न्यायालयाने फेटाळून लावली आहेत. न्यायमूर्ती मुन्नुरी लक्ष्मण आणि न्यायमूर्ती योगेंद्र कुमार पुरोहित यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पत्नीने घटस्फोटाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. तसेच 'दांपत्य हक्कांची पुनर्स्थापना' केली जावी अशी मागणी या महिलेने केली होती. यापूर्वी तिने कनिष्ठ न्यायालयात केलेली मागणी फेटाळण्यात आल्यानंतर त्याच निर्णयाला तिने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

प्रकरण काय होते?

या जोडप्याचे 2018 मध्ये लग्न झाले होते. पतीने पत्नी शरीरसंबंध ठेवायला काहीही कारण नसताना नकार देत असल्याचं म्हटलं होतं लग्नानंतर हे जोडपं एकमेकांसोबत सुमारे 10 दिवस राहिलं. त्यानंतर नोकरीनिमित्त पत्नी जैसलमेरला परतली. नंतर पतीही तिच्यासोबत 15 ते 20 दिवस राहिला, परंतु त्यानंतर त्यांच्यात कोणतेही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत. त्याने असाही आरोप केला की, पत्नी त्याच्या व्यवसायावरून त्याला टोमणे मारते. त्याच्यासोबत राहण्यास पत्नी नकार द्यायची. एवढ्यावरच न थांबता ती अनेकदा आत्महत्या करण्याची धमकी द्यायची. तिच्या या वागण्यामुळे त्याला मानसिक आणि शारीरिक त्रास (क्रूरता) सहन करावा लागल्याचं याचिकेत म्हटलं होतं.

पत्नीचं म्हणणं काय?

पतीने केलेले हे आरोप पत्नीने फेटाळून लावले. तिने पतीवरच उलट आरोप करताना, तो किरकोळ गोष्टींवरून भांडण करायचा आणि तिच्या पगारातील पैसे हवेत म्हणून दबाव टाकायचा. एकतर नोकरी सोडावी किंवा तिच्या पगारातील अर्धी रक्कम द्यावी, अशी मागणी पतीने वारंवार केल्याचंही महिलेने न्यायालयासमोर सांगितलं. मला त्याच्यासोबत पत्नी म्हणून राहायचं नाहीये, असंही या महिलेने न्यायालयाला सांगितलं.  2024 मध्ये, कुटुंब न्यायालयाने क्रूरतेच्या आधारावर पतीला घटस्फोट मंजूर केला आणि पत्नीने केलेली 'दांपत्य हक्कांच्या पुनर्स्थापनेची' मागणी फेटाळून लावली. त्यानंतर तिने या दोन्ही निर्णयांविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने काय म्हटलं?

पुरावे आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे तपासल्यानंतर, उच्च न्यायालयाला असे आढळले की, पत्नीने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, हा पतीचा आरोप पुराव्यासहीत सिद्ध झाला. अंतिम निर्णय देताना न्यायालयाने, “अपीलकर्ता आणि प्रतिवादी यांच्यामध्ये कोणतीही शारीरिक अक्षमता नाही. अशा परिस्थितीत, कोणत्याही वैध कारणाशिवाय, 25 ऑक्टोबर 2018 पासून त्यांच्यात कोणतेही शारीरिक संबंध आलेले नाहीत. अपीलकर्त्याने यासाठी संमती दिली नव्हती, हे देखील सादर केलेली कागदपत्रे आणि पुराव्यांवरून स्पष्ट होते,” असं निरिक्षण नोंदवलं.

पत्नीला धक्का, पतीला दिलासा

पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास दिलेला नकार आणि तिने दिलेली आत्महत्येची धमकी, ही ‘मानसिक क्रूरता’ ठरते आणि घटस्फोटासाठी हा एक वैध आधार आहे, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले. “क्रूरतेच्या आधारावर, कलम 13(1)(ia) अंतर्गत कनिष्ठ न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा आदेश पुराव्यांवर आणि कायद्यावर आधारित आहे. या आदेशात हस्तक्षेप करणे कायद्यानुसार योग्य ठरणार नाही,” असे म्हणत न्यायालयाने पत्नीची याचिका फेटाळून लावत पतीला दिलासा दिला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
High court