• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /आकिब नबीची टीम इंडियात निवड! 2 ऐवजी आता 5 वनडे खेळणार, पाहा भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजसाठी भारतीय संघ

आकिब नबीची टीम इंडियात निवड! 2 ऐवजी आता 5 वनडे खेळणार, पाहा भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजसाठी भारतीय संघ

IND VS NZ ODI : भारतीय गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा अद्याप दुखापतीतून बरा झालेला नाही. तेव्हा त्याच्या ऐवजी आकिब नबीची निवड करण्यात आली असून त्यामुळे आता भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिजमधील सर्व सामन्यांसाठी आकिब नबी हा उपलब्ध असेल.

Reported Bypooja pawar
Published: Oct 31, 2026, 11:46 AM IST|Updated: Oct 31, 2026, 12:16 PM IST
joinshare
आकिब नबीची टीम इंडियात निवड! 2 ऐवजी आता 5 वनडे खेळणार, पाहा भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजसाठी भारतीय संघ
Image Credit: आकिब नबीची टीम इंडियात निवड! 2 ऐवजी आता 5 वनडे खेळणार, पाहा भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजसाठी भारतीय संघ

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
डेंजर अपघातात बिझनेसमनचा मृत्यू! फॉर्च्युनर पुलावरुन नदीत कोसळली, बुडालेल्या कारमध्ये सापडला मृतदेह; मृत्यूच्या एक तास आधीच पत्नीसोबत...

डेंजर अपघातात बिझनेसमनचा मृत्यू! फॉर्च्युनर पुलावरुन नदीत कोसळली, बुडालेल्या कारमध्ये सापडला मृतदेह; मृत्यूच्या एक तास आधीच पत्नीसोबत...

2

'मॅडम, थांबा...', जुहूमध्ये महिलेकडून Hit & Run! कार, 2 दुचाक्यांना धडकल्यानंतर पोलिसांवरही कार चढवली अन्... | Viral Video

3

हॉंगकॉंग सिक्सेसमध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यावर शहबाज शरीफचं बालिश वर्तन, आकाश चोप्राने केलं ट्रोल

4

'त्यांच्या पार्श्वभागांमध्ये अ‍ॅसिड, लाल मिरची पावडर टाकली', राऊताचा गंभीर आरोप; थेट गृहमंत्री, पालकमंत्र्यांना सवाल! 'एका बाईसाठी आणि तिच्या...'

5

आकिब नबीची टीम इंडियात निवड! 2 ऐवजी आता 5 वनडे खेळणार, पाहा भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजसाठी भारतीय संघ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IND VS NZ ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 4 नोव्हेंबर पासून वनडे सीरिज खेळवली जाणार आहे. मात्र त्यापूर्वी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिजमध्ये आकिब नबीला संधी देण्यात आली असून यापूर्वी आकिब नबी याला फक्त दोन सामन्यांसाठी संघात सामील करण्यात आले होते. मात्र आता या सीरिजच्या सुरुवातीच्या सामन्यापासून तो उपलब्ध असेल.

तसं पाहायचं झालं तर तांत्रिकदृष्ट्या प्रसिद्धच्या जागी आकिब नबी हा थेट अधिकृत पर्याय आहे असं म्हणता येणार नाही. कारण आकिब नबीचा आधीच वनडे संघात समावेश होता. मात्र आता तो शेवटच्या दोन सामन्यांऐवजी पहिल्या तीन सामन्यांसाठी सुद्धा संघासोबत असेल, म्हणजेच तो एक प्रकारे प्रसिद्ध कृष्णाची जागा घेईल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजदरम्यान गुवाहाटी येथे झालेल्या एका सामन्यात प्रसिद्ध कृष्णाच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. त्यातून अद्याप तो पूर्णपणे रिकव्हर होऊ शकलेला नाही.

न्यूझीलंडच्या दौऱ्यावर भारतीय संघाला पाच सामन्यांची सीरिज खेळायची आहे. वनडे सीरिजच्यानंतर दोन टेस्ट सामने खेळले जाणार आहे. हेच कारण आहे की वनडे संघाला दोन भागात विभागण्यात आलं. कारण वनडे सीरिजनंतर लगेचच टेस्ट सीरिज  सुद्धा भारतीय संघाला खेळायची आहे. तेव्हा खेळाडूंचं वर्क लोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : रोहित शर्माने का निवडली 45 नंबरची जर्सी? आई आणि राहुल द्रविडशी आहे खास कनेक्शन, स्वतः सांगितला किस्सा

Auqib Nabi added to TeamIndia squad for first three ODIs vs New Zealand Details NZvIND https://t.co/32rAdCiiDh

 BCCI (BCCI) October 31, 2026

पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ :

 

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंह, ईशान किशन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी (फक्त पहिल्या वनडेसाठी), आकिब नबी.

चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ :

श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर, उपकर्णधार), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंह, कुमार कुशाग्र (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, यश ठाकुर, कुलदीप यादव.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Marathi News
Cricket News