• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /डेंजर अपघातात बिझनेसमनचा मृत्यू! फॉर्च्युनर पुलावरुन नदीत कोसळली, बुडालेल्या कारमध्ये सापडला मृतदेह; मृत्यूच्या एक तास आधीच पत्नीसोबत...

डेंजर अपघातात बिझनेसमनचा मृत्यू! फॉर्च्युनर पुलावरुन नदीत कोसळली, बुडालेल्या कारमध्ये सापडला मृतदेह; मृत्यूच्या एक तास आधीच पत्नीसोबत...

हा सारा प्रकार घडण्याच्या अवघ्या तासभर आधी त्यांनी पत्नीसोबतचा फोटो एका छान गाण्यासहीत आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. अपघाताची बातमी समजताच या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडलाय.

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 31, 2026, 12:53 PM IST|Updated: Oct 31, 2026, 03:01 PM IST
joinshare
डेंजर अपघातात बिझनेसमनचा मृत्यू! फॉर्च्युनर पुलावरुन नदीत कोसळली, बुडालेल्या कारमध्ये सापडला मृतदेह; मृत्यूच्या एक तास आधीच पत्नीसोबत...
Image Credit: फॉर्च्युनरचा डेंजर अपघात

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
बंगालच्या उपसागरात ‘मुरासू’ चक्रीवादळ! 120 किमी वेगाने वारे वाहणार?; कोणाला मोठा धोका?

बंगालच्या उपसागरात ‘मुरासू’ चक्रीवादळ! 120 किमी वेगाने वारे वाहणार?; कोणाला मोठा धोका?

2

मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता! हिंगोलीतून काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य, 1972 नंतरचं पहिल्यांदाच घडलं!

3

'माझं काम सर्वांना खुश करणं नाही...' हेड कोच गौतम गंभीर असं का म्हणाला? नेमकं काय घडलं?

4

550 भारतीय लंच ब्रेकअप गेले अन्...लॅपटॉप लॉगआउट, आयडी बंद; पर्सनल मेल आला मग, या कंपनीमध्ये भयानक घडलं

5

आजपासून बदललाय मोबाईल कॉलिंगसंदर्भातील नियम, तुमच्यावर काय परिणाम? जाणून घ्या

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

'कोणाचा कधी, कुठे आणि कसा मृत्यू होईल सांगता येत नाही' हे वाक्य तुम्ही या पूर्वीही नक्कीच ऐकलं असेल. असाच काहीसा प्रकार एका 50 वर्षीय व्यवसायिकासोबत घडला असून वयाच्या 50 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे. भरधाव टोयोटा फॉर्च्युनर कार थेट नदीत कोसळल्याने या व्यवसायिकाचा मृत्यू झाला आहे. घरी परत येत असताना या व्यवसायिकाचा अपघात झाला असून मयत व्यक्ती माजी खासदाराचा नातेवाईक असल्याचं सांगितलं जात आहे.

मयत व्यवसायिक कोण?

हा अपघात बिहारच्या पूर्णियामध्ये गुरुवारी संध्याकाळी घडला. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यवसायिकाचं नाव विनय कुमार ऊर्फ बबलू विश्वास असं आहे. पूर्णियामधील रेनॉल्ट कार शोरुमचे मालक असलेल्या विनय यांची फॉर्च्युनर कार 'कॅप्टन ब्रिज'च्या सुरक्षा कठड्याला तोडून थेट सौरा नदीत कोसळली. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. विनय हे माजी खासदार संतोष कुशवाह यांचे नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. हा सारा प्रकार पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याची प्रथा असलेल्या 'करवा चौथ'च्या दिवशी घडल्याने विनय यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे. या अपघाताच्या एक तास आधी म्हणजेच सायंकाळी सहा वाजता विनय यांनी फेसबुकवरुन आपल्या पत्नीसोबतचा खास फोटो आणि व्हिडीओ शेअर केला होता.

#Bihar : पूर्णिया के कप्तान पुल पर एक तेज रफ्तार फॉर्च्यूनर सौरा नदी में गिर गई, जिससे कार चालक बबलू विश्वास की डूबने से मौत हो गई। मृतक पूर्व सांसद संतोष कुशवाहा के चचेरे भाई थे, इस घटना से परिजनों और राजनीतिक गलियारों में शोक की लहर है। #Bihar #Purnia #Pappuyadav #Breaking https://t.co/OLhl1GnbAI

— Journalist Ravendra kumar (@Chhotukingoffi1) October 29, 2026

तासाभरापूर्वीच पत्नीसोबतचा फोटो केलेला शेअर

हा अपघात 'करवा चौथ'च्या दिवशीच झाला. अत्यंत हृदयद्रावक बाब म्हणजे, अपघाताच्या अवघ्या एक तास आधी, संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास, विनय यांनी फेसबुकवर आपल्या पत्नीसोबतचा एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला होता. सोशल मीडियावर पत्नीसोबतचा फोटो शेअर करताना, त्यांनी "कभी गम ना देना खुशी देने वाले, मुझे प्यार की जिंदगी देने वाले," हे भावनिक गाणं त्यांनी या पोस्टसाठी निवडलं होतं. त्यांच्या पत्नीने 'करवा चौथ'चे व्रत ठेवले होते आणि त्या त्यांच्या घरी परतण्याची वाट पाहत होत्या. मात्र, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विनय यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.  

कठडा तोडला आणि नदीत कोसळली फॉर्च्युनर

मिळालेल्या माहितीनुसार, विनय हे सकाळी डगरुआ ब्लॉकमधील कोचाईली या आपल्या मूळ गावी गेले होते. तिथून ते प्रभात कॉलनीतील आपल्या घरी परतत असताना हा अपघात घडला. त्यांची फॉर्च्युनर कार 'लाईन बाजार' परिसरातील 'कॅप्टन ब्रिज'वरून जात असताना त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यांची एसयूव्ही (SUV) कार पुलाचा लोखंडी आणि काँक्रीटचा सुरक्षा कठडा तोडून थेट सौरा नदीत जाऊन पडली. अपघातादरम्यान झालेल्या धडकेमुळे झालेला मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी तातडीने प्रशासनाला याची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारी आणि स्थानिक पाणबुडे घटनास्थळी पोहोचले. नदीतून वाहन बाहेर काढण्यासाठी एका क्रेनची मदत घेण्यात आली.

Major Accident on Kaptan Bridge in #Purnia, #Bihar: Fortuner Crashes Through Railing into Saura River In Purnia, a speeding Fortuner lost control, broke through the railing of Kaptan Bridge, and plunged into the Saura River. The car driver died in the accident. Police and SDRF teams used a crane to pull the vehicle out of the river. The deceased has been identified as Bablu Vishwas. He is said to be a relative of former MP Santosh Kushwaha.

— Siraj Noorani (@sirajnoorani) October 29, 2026

कारमध्ये सापडला मृतदेह

अथक प्रयत्नांनंतर 'फॉर्च्युनर' कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली. गाडीच्या आत विनय यांचा मृतदेह सापडला. त्यांना तातडीने पूर्णिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर विनय यांना मृत घोषित केले. अपघात झाला तेव्हा कारमध्ये फक्त विनय होते, अशी माहिती डीएसपी अभिनव पराशर यांनी दिली आहे. विनय यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आल्याचंही पराशर यांनी सांगितलं. एसयूव्हीवरील नियंत्रण सुटण्यामागची नेमकी कारणे काय होती, याचा तपास सुरू आहे.

बिहार के पूर्णिया के कप्तान पुल पर एक तेज रफ्तार फॉर्च्यूनर सौरा नदी में गिर गई जिससे कार चालक बबलू विश्वास की डूबने से मौत हो गई। मृतक पूर्व सांसद संतोष कुशवाहा के चचेरे भाई थे https://t.co/ATy2jEJKVo

— Anjali Kumari (@AnjaliKumari009) October 29, 2026

माजी खासदार रुग्णालयात पोहोचले

अपघाताची माहिती मिळताच, विनय यांच्या जवळचे मानले जाणारे माजी खासदार संतोष कुशवाह यांनी जीएमसीएच रुग्णालय गाठले. त्यांनी कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले. कुशवाह यांनी विनय यांचा उल्लेख करताना, "तो माझ्या कुटुंबातील सदस्यासारखा होता. त्याचं असं अचानक जाणं हे माझ्यासाठी आणि समाजासाठीही कधीही न भरुन येण्यासाठी हानी करणारं आहे," असं म्हटलं.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india
Accident