Hong Kong Sixes : हॉंगकॉंग सिक्सेसमध्ये भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्ध 4 विकेटने पराभव मिळाला. या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफहे खूप खुश झाले आणि त्यांच्या एक्स हॅन्डलवरून त्यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. मात्र यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले आहेत.
पंतप्रधान शहबाज शरीफने पाकिस्तान संघाविषयी आपल्या एक्स हॅण्डलवर लिहिले की, 'हाँगकाँग सिक्ससमध्ये भारतावर पाकिस्तानच्या 4 विकेट राखून मिळालेल्या विजयाबद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन. हा एक उत्तम क्रिकेट सामना होता. पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि त्यांच्या टीमचे, त्यांनी केलेल्या तयारीबद्दल तसेच खेळाडूंना दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी कौतुक करतो'.
आकाश चोपडाने शहबाजला केलं ट्रोल :
माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने या पोस्टवरून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना ट्रोल केले. शाहबाज शरीफ यांना टॅग करत आकाश चोप्राने लिहिले, 'आम्ही भारताचा पराभव केला असे म्हणण्याची तुम्हाला इतकी घाई होती की, तुम्ही वस्तुस्थिती तपासण्याची तसदीही घेतली नाही. त्यांचा पहिला सामना ते यूएई विरुद्ध हरले आणि खरं तर, पाकिस्तान सध्या कोणत्या स्तरावर खेळत आहे, याचा अंदाज तुम्ही यावरूनच लावू शकता की, त्या देशाचे पंतप्रधान 'हाँगकाँग सिक्सस' स्पर्धेबद्दल ट्विट करत आहेत. म्हणजे, खरंच!!!'
टीम इंडियाचा 4 विकेटने झाला पराभव :
हाँगकाँग सिक्सस स्पर्धेत टीम इंडियन शशांक सिंहच्या 11 बॉल आणि 40 धावांच्या जोरावर 6 ओव्हरमध्ये 88 धावा केल्या. शशांकने त्याच्या इनिंगमध्ये एकूण 5 सिक्स लगावले होते. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने हा सामना 4 विकेट राखून जिंकला. यात अब्बास आफ्रिदीने 8 बॉलवर 35 धावा केल्या, तर ख्वाजा नाफेने 12 बॉलमध्ये नाबाद 41 धावांचे योगदान दिले. या डावादरम्यान अब्बासने कृणाल पांड्याच्या एका ओव्हर सलग पाच सिक्सही लगावले. अखेरीस पाकिस्तानने अवघ्या 3.5 ओव्हर 2 विकेट गमावून 91 धावा करत विजयाचं टार्गेट पूर्ण केलं.