• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /IND vs NZ: नितीश रेड्डीच्या सिक्सवर फिदा झाली महिला चाहती, बॉलला Kiss करून पुन्हा मैदानात फेकलं, Video Viral

IND vs NZ: नितीश रेड्डीच्या सिक्सवर फिदा झाली महिला चाहती, बॉलला Kiss करून पुन्हा मैदानात फेकलं, Video Viral

IND VS NZ T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चौथा सामना हा शुक्रवारी पार पडला. या सामन्यात नितीश कुमार रेड्डीने मारलेल्या एका सिक्सला पाहून महिला चाहती उत्साहात बेभान झाली आणि तिने स्टॅन्डमध्ये पडलेल्या बॉलला किस करून तो पुन्हा मैदानात फेकला.

Reported Bypooja pawar
Published: Oct 31, 2026, 01:35 PM IST|Updated: Oct 31, 2026, 02:11 PM IST
joinshare
IND vs NZ: नितीश रेड्डीच्या सिक्सवर फिदा झाली महिला चाहती, बॉलला Kiss करून पुन्हा मैदानात फेकलं, Video Viral
Image Credit: नितीश रेड्डीच्या सिक्सवर फिदा झाली महिला चाहती, बॉलला Kiss करून पुन्हा मैदानात फेकलं, Video Viral

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, दिवाळी शॉपिंगसाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होणार

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, दिवाळी शॉपिंगसाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होणार

2

'मी गेल्यावर दुसरं लग्न कर...', इंजिनीअरच्या पत्नीने मुलाला घेऊन उचललं टोकाचं पाऊल; पुणे हादरलं!

3

'प्रेमसंबंध तुटल्यानंतर पूर्वीच्या शारीरिक संबंधांना बलात्कार...', सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

4

'तुम्हाला त्याला बेंचवरच ठेवायचे असेल, तर त्याला घरी पाठवा...', वैभवला वगळल्यानंतर माजी खेळाडू संतापला!

5

'पंजाब्यांना लढायला शिकवू नका!' दिलजीत दोसांझचा दिल्ली कॉन्सर्टमध्ये थेट इशारा; अभिजीत दिपकेंनी मागितली माफी?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IND VS NZ T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळवली जात आहे. या सीरिजमधील तीन सामन्यात भारताने विजय मिळवला तर चौथा सामना हा न्यूझीलंडने जिंकला. त्यामुळे सीरिज सध्या 3 -1 अशी आहे. ज्यात भारताने विजयी आघाडी घेतली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चौथा सामना हा शुक्रवारी पार पडला. या सामन्यात भारतीय फलंदाज नितीश कुमार रेड्डीने 21 धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने दोन सिक्स ठोकले. यावेळी त्यातील एक सिक्स हा थेट स्टॅन्डमध्ये गेला आणि यावेळी एका महिला चाहतीने त्या बॉलला किस घेतले आणि तो मैदानात टाकला. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑकलंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या टी20 सामन्यात, भारतीय इनिंग दरम्यान अशीच एक घटना पाहायला मिळाली. ही घटना नितीश रेड्डी फलंदाजी करत असताना घडली. जरी नितीशला फलंदाजीमध्ये फारशी मोठी कामगिरी करता आली नाही, तरी त्याने मारलेल्या एका सिक्सवर स्टेडियममधील एका महिला चाहत्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली.

सुंदर चाहतीने बॉलला केलं किस :

नितीश कुमार रेड्डीने जसा न्यूझीलंडच्या गोलंदाजाच्या बॉलवर सिक्स लगावला आणि बॉल स्टॅन्डमध्ये पोहोचला. यावेळी महिला चाहतीने तो बॉल पकडला आणि त्याला किस केले. किस केल्यावर महिला चाहतीने तो बॉल पुन्हा मैदानात टाकला. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आणि त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. नितीश कुमार रेड्डीने या सामन्यात 10 बॉलमध्ये 21 धावा ठोकल्या, त्यावेळी नितीशने एकूण 2 सिक्स मारले.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टीम इंडियाचा सीरिजमधील पहिला पराभव :

न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांच्या टी20 सीरिजमध्ये टीम इंडियाला पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.  या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना, ग्लेन फिलिप्स आणि मायकेल ब्रेसवेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने निर्धारित 20 ओव्हरमध्ये एकूण 259 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ केवळ 172 धावा करू शकला, ज्यामुळे त्यांना 87 धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र सलग तीन सामने जिंकल्यामुळे भारतीय संघाने सीरिजमध्ये विजयी आघाडी घेतली होती जी प्रतिस्पर्धी संघाला ओलांडणे अशक्य होते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Marathi News
Cricket News